Sushant Singh Look a like Dainik Gomantak
मनोरंजन

Sushant Singh Look a like : " हुबेहूब सुशांत सिंह राजपूतसारखा दिसणारा हा तरुण कोण?"... राखी म्हणते तो बदला घ्यायला परत आलाय...

अभिनेता सुशांत सिंह राजपूतसारखा हुबेहूब दिसणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतोय, त्यावरुन आता राखी सावंतने प्रतिक्रिया दिली आहे.

Rahul sadolikar

Sushant singh Rajput Look a Like Goes Viral : सध्या सोशल मिडीयावर एक फोटो व्हायरल होत आहे, त्यावरुन आता ड्रामा क्वीन राखी सावंतने आपली प्रतिक्रिया एका व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे. सुशांत सिंग राजपूतचे तीन वर्षांपूर्वी त्याच्या घरी निधन झाले पण त्याचे चाहते आजही त्याच्यावर तितक्याच तीव्रतेने प्रेम करतात. 

आता सुशांतचा लूक व्हायरल होत आहे, जो त्याच्यासारखाच आहे. राखी सावंतने या व्हिडिओवर कमेंट केली आहे, यात राखी चक्क कर्माविषयी बोलत आहे. चला पाहुया कोण आहे हा तरुण आणि राखी नेमकं काय सांगत आहे?

सुशांतचा लूक अ लाईक व्हायरल

सुशांत सिंग राजपूतचे 2020 मध्ये त्याच्या वांद्रे येथील घरी निधन झाले, परंतु तो अजूनही त्याच्या चाहत्यांच्या आठवणीत पूर्वीप्रमाणेच आहे. सोशल मीडियावर त्याचे चाहते नेहमीच त्याला ट्रेंड करत असतात. 

सुशांतने आपल्या कारकिर्दीची सुरुवात टेलिव्हिजनमधून केली आणि तो बॉलीवूडच्या महत्त्वाच्या कलाकारांपैकी एक बनला. त्याने हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक हिट चित्रपट दिले. आता त्याचा एक लूक सोशल मीडियावर व्हायरल होत असून राखी सावंतने त्याच्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.

राखी सावंतने केली न्यायाची मागणी

राखी सावंत तिच्या हटकेपणा आणि स्पष्टवक्तेपणासाठी इंडस्ट्रीत ओळखली जाते. ती नेहमी पापाराझी आणि तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते आणि बऱ्याचदा काही अतरंगी गोष्टीही करत असते. सुशांत सिंग राजपूतचे निधन झाल्यापासून राखी सावंतने सोशल मीडियावर दिवंगत अभिनेत्याची वकिली करत न्यायाची मागणी केली आहे.

सुशांतसारखा दिसणारा हा तरुण आहे तरी कोण?

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी सुशांत सिंग राजपूतच्या लूक लाइकचा एक व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आणि चाहत्यांनी तसेच राखी सावंतने त्यावर प्रतिक्रिया दिली.

 SSR च्या लुकलाइकचे नाव डोनिम अयान आहे आणि त्याच्यात आणि सुशांतच्या चेहऱ्यात विलक्षण साम्य आहे. हे पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. इन्स्टाग्रामवरील पोस्टवर प्रतिक्रिया देताना राखी सावंतने कमेंट केली की, 'तो बदला घेण्यासाठी परत आला आहे, कर्मा.'

नेटीजन्सच्या प्रतिक्रिया

एका नेटिझनने लिहिले, 'अरे देवा, इतकं साम्य आहे. आता सुशांतची उणीव भासणार नाही. एकाने लिहिले की, 'असे दिसते की देवाने सुशांत सिंग राजपूतला परत पाठवले आहे.' तिसऱ्याने कमेंट केली, 'शेवटी सुशांत आला. आम्हाला तुझी खूप आठवण आली भाऊ!!'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: "कुठल्या तोंडानं पाकिस्तानसोबत सामना खेळणार? भारत-पाक क्रिकेट सामन्यावरून ओवैसी आक्रमक, PM मोदींना केला सवाल

Goa Assembly: गोव्यातून दारु तस्करी रोखण्यासाठी सरकार घेणार होलोग्राम स्टिकर्सची मदत; महाराष्ट्राच्या सीमेवर उभारणार चेकपोस्ट

Goa Assembly Session: "गोवा विद्यापीठाच्या प्रकरणावर सभागृह समिती स्थापन करा" युरी आलेमाव

Viral News: तुम्ही म्हणाल 'शी.. घाण' पण, स्वीडिश प्रौढ मनोरंजन कंपनी कर्मचाऱ्यांना देतंय 30 मिनिटांचा खास ब्रेक, जाणून घ्या कारण

Starlink in india: एलन मस्क यांच्या कंपनीला भारतात ब्रेक! स्टारलिंकला फक्त 20 लाख कनेक्शनना परवानगी

SCROLL FOR NEXT