Sushant Singh Death Anniversary Dainik Gomantak
मनोरंजन

Sushant Singh Death Anniversary : सुशांत सिंह राजपूतला जाऊन तीन वर्षे लोटली, आई - वडील आणि बहिणी कोणत्या अवस्थेत आहेत?

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आजच्या दिवशीच जगाचा निरोप घेतला.

Rahul sadolikar

14 जून. तोच दुर्दैवी दिवस ज्या दिवशी बॉलीवूडचा एक गुणी अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू झाला. सुशांतच्या बाबतीत घातपात झाला असं मानणारे त्यांचे कुटुंबीय आणि लाखो चाहते आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. 

सुशांतच्या मृत्यूला तीन वर्षे उलटली तरी मुलाच्या जाण्याने त्याचं कुटुंब आजही दु:खी होतं. सुशांतच्या बहिणी आपल्या लाडक्या भावाची आठवण करून आजही भावूक होतात.

सुशांतची तिसरी पुण्यतिथी

तिसर्‍या पुण्यतिथीला सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबाची परिस्थिती कशी आहे चला पाहुया. त्याच्या बहिणी आणि वडील कसे आहेत. सुशांतच्या लाडक्या कुत्र्याचं काय झालं? सर्व काही जाणून घेऊया.

सुशांत सिंग राजपूतच्या वडिलांचे नाव कृष्ण कुमार सिंग असून ते केके सिंग या नावाने ओळखले जातात. ते पाटण्यात सरकारी नोकरी करायचे पण आता निवृत्त झाले आहेत.

सुशांतचे वडील

मुलाच्या मृत्यूनंतर हॉस्पिटलमधून केके सिंह यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुलाच्या मृत्यूनंतर सहा महिन्यांनी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Sushant Singh Death Anniversary

के.के सिंह यांना हृदयविकाराचा झटका

एकुलता एक मुलगा सुशांत गमावल्यानंतर केके सिंग यांची प्रकृती चिंताजनक बनली होती. आपल्या मुलाच्या जाण्याचे दु:ख त्यांना सहन झाले नाही आणि रात्रंदिवस मुलाच्य़ा मृत्यूच्या दु:खात बुडाल्याने त्यांना हृदयविकाराचा झटकाही आला. 

सुदैवाने, कुटुंबाने त्यांची वेळीच काळजी घेतली, सध्या ते बरे आहेत आणि आपल्या मुलींसोबत राहत आहे. सुशांत सिंग राजपूतच्या बहिणींबद्दल बोलायचं तर, त्याला चार बहिणी आहेत. मोठी बहीण मिटू सिंग ही राज्यस्तरीय क्रिकेटपटू आहे.

सुशांतच्या लाडक्या बहिणी

सुशांतच्या चारही बहिणी एकुलत्या एक भावाच्या लाडक्या होत्या. आजही भावाची आठवण करून त्या भावूक होतात. सुशांतच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्त श्वेताने एक भावनिक पोस्टही लिहिली आहे. त्याने सुशांत आणि मुलांसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे.

सुशांत सिंग राजपूतच्या बहिणी अजूनही सीबीआय तपासाच्या अहवालाची वाट पाहत आहेत. तीन वर्षे उलटून गेल्यानंतरही सीबीआयने कोणतेही आरोपपत्र दाखल केले नाही आणि प्रकरण बंद केले नाही.

Sushant Singh Death Anniversary

2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका

2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती, ज्यामध्ये या प्रकरणाबाबत सीबीआयला प्रश्न विचारण्यात आला होता की, तपास कुठे पोहोचला? मात्र, सुप्रीम कोर्टाने या याचिकेची दखल घेतली नाही आणि अर्जदाराला उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'ब्रिटिशांच्या पक्षाने देशभक्ती शिकवू नये!', BJYM अध्यक्षांनी काँग्रेसला सुनावलं; Watch Video

Goa Rain: मान्सून म्हणतोय,"राम राम"! गोव्यात पावसाचा जोर घटला; ऑक्टोबर हीटची चाहूल

Charter Flight: पर्यटन हंगामाची दणक्यात सुरुवात! रशियातून पहिले चार्टर विमान मोपा विमानतळावर दाखल; गोव्याचे पारंपरिक आदरातिथ्य

Bethora Road Issue: बेतोड्यातील रस्त्यांची अवस्था दयनीय

Goa Politics: खरी कुजबुज, मायकल जागे झाले!

SCROLL FOR NEXT