Sushant singh Rajput Dainik Gomantak
मनोरंजन

Sushant Singh Rajput: सुशांतच्या आत्महत्येचे अमेरिका कनेक्शन? जाणून घ्या सीबीआय कशाच्या प्रतिक्षेत

Sushant Singh Rajput: बॉलीवूडमध्ये एकापेक्षा एक हीट चित्रपट देत इंडस्ट्रीमध्ये वेगळे स्थान निर्माण केले होते.

दैनिक गोमन्तक

Sushant Singh Rajput: अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला 3 वर्षे उलटून गेली आहेत. मात्र सीबीआयचा तपास आजही सुरुच आहे. सुशांत सिंगचे चाहते आजही सीबीआयला त्याच्या मृत्यूबाबत काय हाती लागले याची चौकशी करताना दिसतात. आता सुशांत सिंगच्या मृत्यूबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

14 जून 2020 रोजी ज्या सुशांतने मुंबईतील त्याच्या अपार्टमेंटमध्ये आत्महत्या केली होती. आपल्या अभिनय क्षेत्रातल्या करिअरची सुरुवात सुशांतने टीव्हीपासून केली होती. त्यानंतर बॉलीवूडमध्ये एकापेक्षा एक हीट चित्रपट देत इंडस्ट्रीमध्ये वेगळे स्थान निर्माण केले होते. त्याच्या सहज अभिनयाने घराघरात पोहोचलेल्या सुशांतचा चाहतावर्गदेखील मोठा होता.

सुशांतच्या अचानक जाण्याने मोठा धक्का बसला होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांनी आणि चाहत्यांनी सुशांतची ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे म्हणत सीबीआयने तपास करण्याची मागणी केली होती. मात्र सीबीआयला अद्याप कोणतेही ठोस पुरावे मिळाले नाहीत.

दरम्यान, 2021 मध्ये प्रीमियर अँटी करप्शन एजन्सीने कॅलिफोर्निया येथे असलेल्या मुख्यालय गुगल आणि फेसबुक या तपासात मदत करण्यासाठी औपचारिक विनंती केली होती. सुशांतने डिलिट केलेले सर्व चॅट, ईमेल किंवा पोस्टची माहिती देण्यात सांगितली ज्याचे विश्लेषण करून त्यांना घटनांची पार्श्वभूमी समजण्यास मदत होईल. मात्र ही टेक्निकल माहीती अद्याप मिळाली नसल्याने अंतिम निर्णय देऊ शकले नाही.

भारत आणि यूएस मध्ये परस्पर कायदेशीर सहाय्य करार (MLAT) आहे, या करारान्वये दोन्ही बाजूंना कोणत्याही देशांतर्गत तपासात माहिती मिळू शकते.

सीबीआयचा संथ गतीने चाललेल्या तपासावर टीका केली जात असून अशा प्रकारे हा तपास बंद पाडण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीदरम्यान, आम्हाला अशी माणसे माहीती आहेत ज्यांच्याकडे या केससंबंधित काही ठोस पुरावे आहेत. त्यांना आम्ही हे पुरावे पोलिसांकडे सोपवण्यास सांगितले असल्याचे म्हटले आहे. आता गुगल आणि फेसबुक कडून सीबीआयला मदत मिळाल्यानंतर केसला वेगळे वळण मिळणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: ‘मोंथा’चा गोव्‍यालाही बसणार फटका! आणखी 3 दिवस मुसळधार, वेगवान वारे वाहणार; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Caranzalem Beach:गोव्यात ‘ओशेनमॅन’ स्पर्धा मच्छिमारांनी रोखली, मिलिंद सोमणसह स्पर्धकांना फटका; आयोजकावर फसवणुकीचा गुन्हा Watch Video

Horoscope: घरात मंगलकार्याची चर्चा,कामात थोडे अडथळे येऊ शकतात; संयम ठेवा

Delhi Crime: एक महिन्यापासून देता होता त्रास, दुचाकीवरुन पाठलाग करुन विद्यार्थिनीवर केला ॲसिड हल्ला; ओळखीतल्या तरुणासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Ajinkya Rahane: "टीम इंडियाला माझी गरज..." 159 धावांच्या धडाकेबाज खेळीनंतर अजिंक्य रहाणेने निवडकर्त्यांवर साधला निशाणा!

SCROLL FOR NEXT