गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असणारा अभिनेता विजयचा लिओ हा चित्रपट 19 ऑक्टोबरला रिलीज झाला आणि त्याच्या चाहत्यांनी चित्रपटाला अक्षरश: डोक्यावर घेतले.
हाय ऑक्टेन ड्रामा आणि विजयसोबत व्हिलन बनून भिडलेला संजय दत्त प्रेक्षकांना भावला. चला पाहुया विजयच्या या लिओने प्रेक्षकांवर कसे गारुड घातले.
सुरुवातीच्या Twitter (आता X) प्रतिसादांवरून असेच दिसते की विजयचा लिओ प्रेक्षकांना संमिश्र अनुभव देत आहे. काही प्रेक्षक याला सर्वांनी पाहावा असा नाट्य अनुभव म्हणत आहेत आणि इतर काही प्रेक्षक म्हणतात त्याप्रमाणे हा निराशाजनक चित्रपट आहे.
सकारात्मक रिव्ह्यू चित्रपटाच्या अपवादात्मक कामगिरीवर प्रकाश टाकतात. नेटिझन्सनी कथेचं, पटकथेचं आणि चित्रपटाच्या विलक्षण मांडणीचे कौतुक केले आहे.
दिग्दर्शक लोकेश कनगराज यांचे सिनेमॅटिक पराक्रम स्पष्टपणे दिसून येते कारण तो एका उल्लेखनीय व्यक्तिरेखेला जिवंत करतो आणि एक भन्नाट गोष्ट सांगतो.
हा चित्रपट आश्चर्याने भरलेला आहे असे म्हटले जात आहे. आणि मध्यांतर, क्लायमॅक्स आणि अॅक्शन सीक्वेन्स यांसारखे सरप्राईजिंग क्षण, खुर्चीवर बसलेल्या प्रेक्षकांना धक्क्यावर धक्के देतात हे नक्की.
अनिरुद्ध रविचंदरच्या पार्श्वसंगीताचं चित्रपटाचा कणा म्हणून कौतुक केले जात आहे. हे संगीत तुम्हाला एका वेगळ्या दुनियेत नेईल हे नक्की. त्रिशा, संजय दत्त, अर्जुन, जीवीएम आणि मॅथ्यू थॉमस यांच्यासह सहाय्यक कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट व्यक्तिरेखा आणि अभिनयासाठी प्रशंसा मिळवली आहे.
लिओबाबतीत काही निगेटिव्ह रिव्ह्यूही समोर आले आहेत. त्यानुसार लिओ चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरला आहे. काही प्रेक्षकांनी असेही म्हटले आहे की चित्रपट एक सातत्यपूर्ण संघर्ष राखण्यासाठी चित्रपट कसरत करत राहतो, ज्यामुळे कंटाळवाणे क्षण येतात. त्यामुळे प्रेक्षक चित्रपटापासून दूर जातात.
काही समीक्षक लिओची तुलना लोकेश कनागराजच्या मागील चित्रपट, विक्रम आणि कैथी यांच्याशी करत आहेत आणि ते त्यांचे आतापर्यंतचे सर्वात कमकुवत काम असल्याचे समजत आहेत. थलपथी विजय आणि कलाकारांकडून दमदार कामगिरी असूनही, लिओचे वर्णन एक मध्यम चित्रपट म्हणून केले जात आहे.