Sunny Deol  Dainik Gomantak
मनोरंजन

Sunny Deol: मुलाच्या लग्नात सनी देओल झाला ट्रोल; नेटकरी म्हणाले पैशासाठी...

Sunny Deol: सनी देओल आपल्या 'गदर 2' मधील 'तारा सिंह' च्या गेटअपमध्ये दिसून आला.

दैनिक गोमन्तक

Sunny Deol: सनी देओलचा मुलगा करण देओलच्या लग्नामुळे सध्या देओल कुटुंब चर्चेत आहे. करण लवकरच दृश्या आचार्याबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. शुक्रवारी संध्याकाळी मुंबईत संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यादरम्यान, धर्मेंद्र, सनी देओल, बॉबी देओल सहित देओल कुटुंबिय दिसून आले.

करणच्या संगीताचा कार्यक्रम असला तरी चर्चा मात्र सनी देओलच्या लूकची रंगली आहे. यादरम्यान, सनी देओल आपल्या 'गदर 2' च्या 'तारा सिंह' सारखा गेटअपमध्ये दिसून आला.

व्हायरल झालेल्या फोटोनंतर मात्र सोशल मिडियावर सनी देओलला चांगलेच ट्रोल केले जात आहेत. आणखी एका व्हिडिओमध्ये 2001 मध्ये प्रदर्शित झालेला ब्लॉकबस्टर चित्रपट गदरमधील उदित नारायण यांनी गायलेले ' मैं निकला गड्डी लेकर ' या गाण्यावर परफॉर्म करताना दिसून आला आहे.

सोशल मिडियावर सनी देओलला ट्रोल केले जात आहे. एका युजरने कमेंट करताना म्हटले आहे की, "हाइट्स ऑफ प्रमोशन" तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, 'फिल्मचे प्रमोशन करण्यासाठी मुलाचे लग्न लाऊन दिले.' आणखी एका युजरने म्हटले आहे की, 'ही लोकं पैशाच्या पाठीमागे धावणारी आहेत.'

मिळालेल्या माहीतीनुसार, गदरचा सिक्वेल 11 ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. महत्वाचे म्हणजे, रणबीर कपूरचा अॅनिमल आणि अक्षय कुमारचा ओएमजी 2 याचवेळी प्रदर्शित होणार आहे.

रजनीकांतचा जेलर आणि चिरंजीवीचा भोला शंकर देखील याचदिवशी रिलिज होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफीसवर कोणता चित्रपट चालणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. याबरोबरच गदरप्रमाणेच त्याचा सिक्वेल ब्लॉकबस्टर ठरणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Tension: शांतता चर्चा फिस्कटली, पाकड्यांचा अफगाणिस्तावर पुन्हा हल्ला, सीमा सुरक्षारक्षकांवर केला अंदाधुंद गोळीबार VIDOE

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

IND vs AUS: टीम इंडियाचा डबल धमाका; मालिका विजयाच्या दिशेने कूच, सोबतच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड; 'गोल्ड कोस्ट'वर कांगारुंना पाजलं पराभवाचं पाणी VIDEO

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

SCROLL FOR NEXT