Actor Dharmendra Heath Updates Dainik Gomantak
मनोरंजन

अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती खालावल्याच्या बातम्यांवर अखेर सनी देओलची प्रतिक्रिया..

Rahul sadolikar

Actor Dharmendra Heath Updates : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली असुन त्यांना उपचारासाठी अमेरिकेत हलवले आहे. मनोरंजन विश्वासाठी ही चिंताजनक बातमी असुन याबद्दलची माहिती त्यांचा मुलगा अभिनेता सनी देओलने माध्यमांना दिली आहे.

धर्मेंद्र अमेरिकेला रवाना

गेल्या काही दिवसांपासून अभिनेते धर्मेंद्र त्यांच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटामुळ प्रचंड चर्चेत होते.  दरम्यान, धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली असून सनी देओल उपचारासाठी वडिलांसोबत अमेरिकेला रवाना झाल्याची बातमी नुकतीच आली.

धर्मेंद्र आजाराने त्रस्त

11 सप्टेंबर रोजी याबद्दलच्या अपडेटस् समोर आल्या होत्या की, 87 वर्षीय धर्मेंद्र हे वाढत्या वयामुळे आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त आहेत. 

त्यामुळे सनी देओल त्याच्या वडिलांना उपचारासाठी अमेरिकेला घेऊन गेला असून तो 15 ते 20 दिवस तेथे राहणार आहे अशी चर्चा होती यावर आता सनी देओलच्या टीमने सत्य सांगितले आहे.

सनी देओलच्या टीमने सांगितली वेगळीच माहिती

सनी देओलने आता मंगळवारी हे सर्व वृत्त फेटाळून लावले आहे. सनी देओलच्या टीमने इंडिया टीव्हीला सांगितले की धर्मेंद्र आणि सनी देओल अमेरिकेला नक्कीच गेले आहेत, परंतु उपचारांसाठी नाही तर सुट्टीसाठी.

सनी देओलची इन्स्टाग्राम पोस्ट

अभिनेता आणि त्याचे वडील 16 सप्टेंबरला भारतात परतणार असल्याचीही माहिती सनी देओलच्या टीमने दिली आहे.

सनी देओलने काल त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली होती, शेअर केलेल्या पोस्टमध्ये तो त्याच्या मित्राचा वाढदिवस साजरा करताना दिसला होता. 

सनी देओलने पोस्टमध्ये लिहिले की, "कॅलिफोर्नियामध्ये विनीतचा वाढदिवस साजरा केला."

गदर 2 चं कलेक्शन

गदर 2 च्या बिझनेसबद्दल बोलायचे तर हा चित्रपट आता 500 कोटींच्या क्लबमध्ये दाखल झाला आहे. 

सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटाच्या शर्यतीत गदर २ ने आता बाहुबली २ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांनाही मागे टाकले आहे. 

रिलीजच्या जवळपास एका महिन्यात, गदर 2 ने 515 कोटी रुपयांचा निव्वळ व्यवसाय केला आहे.  

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT