Sunny Deol-Dimple kapadiya Dainik Gomantak
मनोरंजन

Sunny Deol-Dimple kapadia: 'या' दिग्गज अभिनेत्रीबरोबर जोडले होते सनी देओलचे नाव

Sunny Deol-Dimple kapadiya: आता सनी देओलच्या एकेकाळी गाजलेल्या लव्ह लाइफबद्दल पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.

दैनिक गोमन्तक

Sunny Deol-Dimple kapadiya: सनी देओलचा आगामी चित्रपट 'गदर 2' 11 ऑगस्टला चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. सनी देओलचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात सनी देओलशिवाय अमिषा पटेलही मुख्य भूमिकेत आहे.

चित्रपटामुळे हे कलाकार भलतेच चर्चेत आले आहेत. कलांकारांच्या वैयक्तिक आयुष्यातील जुन्या आठवणी आणि अफवांची पुन्हा एकदा चर्चा होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून अमिषा पटेल आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती. आता सनी देओलच्या एकेकाळी गाजलेल्या लव्ह लाइफबद्दल पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.

सनी देओलने 1983 मध्ये 'बेताब' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. एकेकाळी सनीचे अमृता सिंगसोबत अफेअर असल्याच्याही चर्चा होत्या. मात्र, सर्वात जास्त डिंपल आणि सनी देओलच्या अफेअरची चर्चा रंगली होती.

असे म्हटले जाते की, डिंपल आणि राजेश खन्ना यांच्या लग्नानंतर त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता आणि त्यामुळे राजेश खन्ना यांना घटस्पोट न देता डिंपल कापडिया निघून आल्या होत्या. त्यांच्या या कठीण काळात सनी दओलने धीर दिला होता.

त्यावेळी अशा अफवादेखील पसरल्या होत्या की, त्यांच्यामध्ये इतकी जवळकीकता वाढली होती की डिंपल यांच्या मुली ट्विंकल खन्ना आणि रिंकी खन्ना सनी देओलला छोटे पापा म्हणू लागल्या होत्या.

जेव्हा सनी देओलच्या पत्नी पूजाला सनी देओल आणि डिंपलची जवळीक कळली तेव्हा घरात खळबळ उडाली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यानंतर पूजाने सनी देओलला शपथ दिली की, जर तो आज नंतर डिंपलला भेटली तर ती मुलांसह घर सोडून जाईल. यानंतर सनी त्यानंतर डिंपलपासून वेगळा झाल्याचे म्हटले जाते.

सनी देओल आणि डिंपल हे अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसले आहेत. यामध्ये 'नरसिंग', 'मांझील-मांझील', 'आग का गोल', 'गुणा' आणि 'अर्जुन' या चित्रपटांचा समावेश आहे. असे म्हटले जाते की, चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान दोघे एकमेकांच्या जवळ आले होते.

दरम्यान, आता 11 ऑगस्टला चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी 'गदर 2' च्या रिलिज झालेल्या ट्रेलरचेदेखील कौतुक होताना दिसत आहे. 'उड जा काले कावा' या गाण्याचा रिमेक रिलिज झाला असून सोशल मिडिया( Social Media )वर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

महत्वाचे म्हणजे, अक्षय कुमारच्या 'ओह माय गॉड 2' हा चित्रपटदेखील याचदिवशी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे कोणता चित्रपट बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सनी देओल आणि अमिषा पटेलच्या अभिनयाची जादू पुन्हा चालणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT