Shah Rukh Khan| mannat| bollywood Dainik Gomantak
मनोरंजन

Strangers entered 'Mannat': शाहरुखच्या 'मन्नत'मध्ये घुसले दोन अनोळखी तरुण

अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत या निवासस्थानी दोन अनोळखी तरुण घुसल्याचं उघड झाले आहे.

Rahul sadolikar

बॉलिवूडचा बादशाह म्हटल्या जाणार्‍या शाहरुख खानच्या सुरक्षेतील मोठी त्रुटी समोर आली आहे. गुरुवारी त्यांच्या मुंबईतील 'मन्नत' अपार्टमेंटमध्ये दोन अनोळखी व्यक्ती घुसल्या. हे दोघेही गुजरातचे रहिवासी आहेत. 

सुरक्षा रक्षकांनी या दोन अनोळखी व्यक्तींना पकडून वांद्रे पोलिसांच्या ताब्यात दिले. चौकशी केली असता त्यांनी तो गुजरातचा रहिवासी असल्याचे सांगितले.

माहितीनुसार, मन्नतमध्ये दाखल झालेले दोघेजण 20 आणि 22 वर्षांचे आहेत. त्यांनी स्वत:ला शाहरुख खानचे मोठे चाहते असल्याचे सांगितले. तथापि, त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी) अंतर्गत घुसखोरी आणि इतर संबंधित गुन्ह्यांचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर खबरदारी म्हणून शाहरुख खानच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे

गेल्या वर्षी शाहरुख आणि गौरीने 'मन्नत'साठी नवीन नेमप्लेट घेतली होती, जी गडद रंगाच्या भिंतीवर चमकदार लाईटने सजवलेली आहे. मन्नतच्या बाहेर किंग खानच्या चाहत्यांची गर्दी अनेकदा पाहायला मिळते. 

चाहत्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि स्वतःची एक झलक दाखवण्यासाठी शाहरुख स्वतः बाल्कनीत येतो. यादरम्यान शाहरुख बाल्कनीतून खचाखच भरलेल्या गर्दीसोबत सेल्फीही काढतो.

'पठाण' चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच शाहरुख खानने मन्नतच्या बाल्कनीतून चाहत्यांची भेट घेतली. मन्नतच्या 2 नोव्हेंबरच्या वाढदिवसादिवशी मोठी गर्दी जमली होती, ज्याचे व्हिडिओ शाहरुखने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले होते.

पठाणच्या रिलीजनंतर शाहरुखच्या फॅन्सच्या उत्साहाला उधाण आलं आहे. शाहरुखवरच्या अतिप्रेमापोटी या फॅन्सनी मन्नतमध्ये प्रवेश केला असला तरी अशा घटनांंमुळे काही अनुचित घटना घडू शकते त्यामुळे साहजिकच आता मन्नतची सिक्योरिटी वाढवण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ganesh Chaturthi: 'दीपवती' नावाने ओळखले जाणारे, गोव्यातील सर्वांत मोठे गणेश मंदिर; 16 व्या शतकाच्या पूर्वार्धात स्थलांतरीत झाले..

Goa Crime: 'इन्स्टा'वरून युवतींची फसवणूक, 5 अजामीन वॉरंट, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा; अट्टल गुन्हेगाराची कोठडीत रवानगी

Goa Crime: सिंगापूरातून दिल्लीत उतरला, विमानतळावरच भामट्याला अटक; शिवोलीतील महिलेला घातला होता 1 कोटींचा गंडा

Goa Film Festival: 'कोकणीतून चित्रपट निर्मितीसाठी पुढे या'! CM सावंतांचे आवाहन; राज्य चित्रपट महोत्सवाचा थाटात समारोप

Goa CM Helpline: तुमच्या तक्रारी थेट CM सावंत ऐकणार, एका फोनवर प्रश्न सुटणार; 24x7 नागरिकांसाठी 'मुख्यमंत्री हेल्पलाईन' सुरू

SCROLL FOR NEXT