Jawan Collection Dainik Gomantak
मनोरंजन

Jawan Collection : जय जवान... किंग खानचा जलवा, हजार कोटींचा पल्ला गाठलाच

अभिनेता शाहरुख खानच्या जवान एक हजार कोटींच्या क्लबमध्ये अखेर प्रवेश मिळवलाच.

Rahul sadolikar

Shahrukh Khan's Jawan Box Office Collection : शाहरुख खानच्या जवान चित्रपटाने गेल्या काही दिवसांत बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. पहिल्या दिवशीच ओपनिंगच्या आकडेवारीने सर्वांना थक्क करणाऱ्या जवानने आता 18 व्या दिवशी 1 हजार कोटींचा पल्ला गाठला आहे.

नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या जवानने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींची कमाई केली आहे. शाहरुखचे चाहते या बातमीने नक्कीच जल्लोष साजरा करतील.

रेड चिलीज एन्टरटेनमेंट

 रेड चिलीज एंटरटेनमेंटने सोमवारी 24 सप्टेंबरला X (पूर्वीचे ट्विटर) वर जवानची ऑफिसवरची कमाई शेअर केली, या पोस्टला कॅप्शन लिहिली होती "इतिहास घडला. जवान! तुम्ही पाहिला आहे का?" 

चित्रपट दिग्दर्शक ऍटलीनेही( Jawan Derected by Atlee) चित्रपटाची क्लिप शेअर केली आणि ट्विट केले, “देव आमच्यावर खूप दयाळू आहे. तुम्हा सर्वांचे आभार..." एटली दिग्दर्शित जवान  चित्रपट हा शाहरुखच्या पठान नंतरचा दुसरा ₹ 1000 कोटी कमावणारा चित्रपट आहे

चाहत्यांच्या प्रतिक्रिया

शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये शाहरुख खानने जवानमध्ये साकारलेली विक्रम राठौर आणि जवानचा मुलगा आझाद ही पात्रं दिसतात. क्लिपवरील मजकूर असा आहे, " जगभरात ₹ 1004.92 कोटी कमाई." 

या पोस्टवर प्रतिक्रिया देताना, एका X युजरने लिहिले, "SRK (शाहरुख खान) + Atlee + अनिरुद्ध रविचंदर (चित्रपटाचे संगीतकार)... लवकरच ₹ 1500 कोटी."

 दुसर्‍या एका युजरने ट्विट केले, "जगभरात दोन ₹ 1000 कोटी कमावणारा एकमेव भारतीय अभिनेता (शाहरुख खान) आहे ."

पठान आणि जवान

या वर्षाच्या सुरुवातीला, शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम अभिनीत पठाणने जगभरातील बॉक्स ऑफिसवर ₹ 1000 कोटींची कमाई केली होती . 

'पठाण '25 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने चार आठवड्यांनंतर, 21 फेब्रुवारी रोजी जगभरात ₹ 1000 कोटींचा टप्पा ओलांडला होता.

पठाणशी तुलना करता , जवानने केवळ 18 दिवसांत 1 हजार कोटींचा टप्पा ओलांडला. जवान 7 सप्टेंबर रोजी हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित झाला.

तिसऱ्या वीकेंडची कमाई

तिसर्‍या वीकेंडला जवानने मोठी झेप घेतली. शनिवारी चित्रपटाचे जगभरातील एकूण कमाई  979.08 कोटी होती. 

24 सप्टेंबरला चित्रपटाने आणखी 25.84 कोटींची कमाई केली आणि जगभरातील एकूण कमाई  1004 कोटींहून अधिक झाली .

 दरम्यान, Sacnilk.com च्या अहवालानुसार , जवानने तिसर्‍या रविवारी भारतात  14.95 कोटी नेट कलेक्शन केले, या कमाईमुळे जवानचे देशांतर्गत बॉक्स ऑफिस एकूण  560.78 कोटी झाले.

जवानची कमाई

या चित्रपटाने पहिल्याच दिवशी भारतात सर्व भाषांमध्ये  75 कोटींची कमाई केली होती. जवानचे भारतात पहिल्या आठवड्याचे कलेक्शन  389.88 कोटी होते, तर 2 व्या आठवड्यात, चित्रपटाने आणखी  136.1 कोटी कमावले.

जवानची स्टारकास्ट

शाहरुख खान, नयनतारा आणि विजय सेतुपती व्यतिरिक्त, जवान प्रियामणी, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा, लहर खान, गिरिजा ओक आणि संजीता भट्टाचार्य यांच्याही भूमिका आहेत. संजय दत्त आणि दीपिका पदुकोण यांनीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

माणुसकीला काळिमा! छत्तीसगडमध्ये 19 वर्षीय तरुणीवर 5 जणांचा सामूहिक अत्याचार; पोलीस हेल्पलाइनचा ड्रायव्हरच निघाला नराधम

Viral Video: "मग आम्ही काय पाकिस्तानी आहोत का?", काश्मिरी माणसानं पर्यटकाला दिलं झणझणीत उत्तर; सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

लोकहितासाठी सरकार मागे हटण्यासही तयार! आंदोलकांनी चर्चेसाठी पुढे यावे- श्रीपाद नाईक

Lucky Gemstones: ग्रहांच्या 'बॅटिंग'वर तुम्ही मारणार सिक्सर! कामात फोकस आणि नफ्यात वाढ देणारी 5 लकी रत्ने; करिअरच्या मैदानात आता तुम्हीच ठरणार मॅन ऑफ द मॅच

मोपा विमानतळावर 3.16 कोटींचे अमली पदार्थ जप्त; आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT