S.S Rajamauli
James Cameron
S.S Rajamauli James Cameron Dainik Gomantak
मनोरंजन

S.S Rajamauli-James Cameron 'अवतार'चा दिग्दर्शक राजामौली यांच्यासोबत बनवणार पुढचा चित्रपट?

गोमन्तक डिजिटल टीम

एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर'या चित्रपटाने यादिवसांत जागतिक स्तरावर आपले नाव कमावले आहे. आता या चित्रपटाने हॉलिवूड दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांचेही लक्ष वेधून घेतले,

ज्यांनी एसएस राजामौली यांच्याशी संवाद साधत त्यांचे व्हिजन, त्यांची जबरदस्त स्टोरीटेलिंग आणि त्यांच्या इमोशन्सने भरपूर असलेल्या पात्रांची प्रशंसा केली.

एसएस राजामौली यांच्याशी झालेल्या संभाषणात दिग्दर्शक जेम्स कॅमेरून म्हणाले, "तुमच्या चित्रपटातील पात्रे पाहणे ही एक अनुभूती आहे. आणि तुमचा सेटअप आग, पाणी, कथा, एकामागून एक येणारे सीन, मग तो जे करत आहे त्याच्या बॅकस्टोरीवरून पुढे जाणे, ट्विस्ट आणि टर्न आणि त्यांची मैत्री हे खूप शक्तिशाली होतं.

आणि मला ही गोष्ट आवडली की तुम्ही सर्व गोष्टी एकत्र दाखवल्या, हा एक फुल शो आहे आणि मला तो आवडला. तुमचा देश आणि तुमच्या प्रेक्षकांना किती अभिमान वाटत असेल? याची मी फक्त कल्पना करू शकतो. तुम्हाला टॉप ऑफ द वर्ल्ड ची असल्यासारखं वाटत असेल."

चित्रपटाबद्दल बोलण्याव्यतिरिक्त, कॅमेरून यांच्या पत्नीने खुलासा केला कि, त्यांनी एकदा नव्हे तर दोनदा 'आरआरआर' पाहिला, 'अवतार' आणि 'टायटॅनिक'च्या दिग्दर्शक असणारे कॅमेरून यांनी एसएस राजामौली यांना आंतरराष्ट्रीय चित्रपटात काम करण्याचे आमंत्रणही दिले.

दिग्दर्शक जेम्स कॅमेरून पुढे म्हणाले, "आणि आणखी एक गोष्ट... तुम्हाला कधी इथे चित्रपट बनवायचा असेल तर लेट्स टॉक."

जागतिक बॉक्स ऑफिसवर ₹1,200-₹1,258 कोटींची कमाई करणारा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी भारतीय चित्रपट बनण्याव्यतिरिक्त, एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर'या सिनेमाने 'बेस्ट ओरिजनल सॉंग'साठी भारतातील पहिला गोल्डन ग्लोब पुरस्कारही पटकावला.

एवढेच नव्हे तर, या ऐतिहासिक चित्रपटाने 28 व्या क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्समध्ये 'बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म' आणि 'बेस्ट सॉंग'चे पुरस्कारही जिंकले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Supreme Court: राष्ट्रीय ग्राहक आयोगाच्या सदस्यांना कोर्टाने फटकारले; आदेशाच्या उल्लंघनबाबत बजावली अवमानाची नोटीस

Goa Today's Live News: भाजप सरकार सिद्धी नाईक खून प्रकरणाचा गेल्या तीन वर्षात छडा लावण्यात अपयशी ठरले -काँग्रेस

SCROLL FOR NEXT