Saif Ali Khan: नेटकरी का करत आहेत सैफ आणि मलायकाची तुलना

Saif Ali Khan: त्याच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंटस केल्या आहेत. सैफने आपल्या शरीराची काळजी घेतली नसल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.
Saif Ali Khan
Saif Ali KhanDainik Gomantak

Saif Ali Khan: बॉलीवूडच्या कलाकार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता सैफअली खान मात्र एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. सैफ अली खानला बॉडी शेंमिगचा सामना करावा लागला असल्याचे दिसून आले आहे.

सैफअली खानचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये तो गाडीमध्ये उतरत असल्याचे दिसत आहे.त्याच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंटस केल्या आहेत. सैफने आपल्या शरीराची काळजी घेतली नसल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर, नेटकऱ्यांच्या म्हणण्यानुसार सैफची चालण्याची स्टाईलसुद्धा बदलली आहे.तो मलायकासारखा चालतो आहे असे काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे, त्याचबरोबर करिना आपल्या शरीराची आपल्या आरोग्याची किती काळजी घेत असते. सैफने मात्र घरी बसून आपले वजन वाढवले आहे असे म्हणत नेटकऱ्यांनी वाढलेल्या वजनावरुन सैफला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.

Saif Ali Khan
Shahid Kapoor: अमेझॉन प्राइम व्हिडिओने प्रदर्शित केलेला 'फर्जी'मधला शाहिद कपूरचा कॅरेक्टर व्हिडिओ पाहिलात का?

दरम्यान, काही दिवसांपूर्वी आदिपुरुष या चित्रपटातील रावणाच्या लूकमुळे तो ट्रोल झाला आहे. मात्र आता पुन्हा एकदा सैफ अली खान हा ट्रोल झाला आहे. त्याला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com