Ram Mandir in Ayodhya  Dainik Gomantak
मनोरंजन

Ram Mandir: राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी थलैवाला निमंत्रण

Ram Mandir: त्यानंतर २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होणार आहे.

दैनिक गोमन्तक

Ram Mandir: २२ जानेवारीला आयोध्येतील राम मंदीराची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. संपूर्ण देश यासाठी उत्सुक असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या उत्सवासाठी देशातील अनेक महत्वाच्या व्यक्तींना आमंत्रण दिले जात आहे. याआधी रामायण या मालिकेत राम-सीतेची भूमिका निभावणाऱ्या कलाकारांना आमंत्रित केल्याची माहीती समोर आली होती.

आता साऊथ सुपरस्टार थैलायवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रजनीकांत यांनादेखील राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आमंत्रण मिळाल्याची माहीती समोर आली आहे. भाजपच्या नेत्याने स्वत: रजनीकांत यांच्या घरी जाऊन त्यांना आमंत्रण दिले आहे. भाजप रा अर्जुनमूर्ति यांनी ट्विटरवर फोटो शेअर केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ८०००पेक्षा जास्त लोकांना या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आली आहेत. १५ जानेवारीला रामाच्या बालरुपाला गर्भागृहात स्थापन करण्यात येणार आहे. त्यानंतर २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होणार आहे.

Rajnikant

यामध्ये उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय राजकारण, बिझनेस, बॉलीवूड आणि साऊथ इंडस्ट्रीमधील अनेक प्रसिद्ध व्यक्ती या कार्यक्रमात सामील होणार आहेत. असे म्हटले जात आहे की, यामध्ये १ लाखापेक्षा जास्त भाविक या कार्यक्रमात सामील केले जाऊ शकतात.

रजनीकांत शिवाय प्रभास, ऋषभ शेट्टी, मोहनलाल आणि चिरंजीवी यांचादेखील निमंत्रण मिळालेल्यांच्या यादीत समावेश असल्याचे म्हटले जात आहे. बॉलीवूडमधील अमिताभ बच्चन, सनी देओल, अजय देवगन, माधुरी दीक्षित, आयुष्मान खुराना, रणबीर कपूर, आलिया भट्ट, अनुपम खेर, अरुण गोविल, दीपिका चिखलिया आणि टाइगर श्रॉफ यांना निमंत्रण मिळाले आहे. मात्र नेहमीच भाजपाची बाजू घेणाऱ्या कंगणा रनौतला निमंत्रण न मिळाल्याने चर्चांना उधाण आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT