Nayanthara  Dainik Gomantak
मनोरंजन

Nayanthara: बॉलीवूडवर नाराज नयनतारा; दीपिका ठरली कारण

Nayanthara: नयनतारा ही दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिला 'लेडी सुपरस्टार' म्हणतात. रजनीकांतची जशी क्रेझ आहे तशीच क्रेझ नयनतारासाठीही आहे.

दैनिक गोमन्तक

Nayanthara: 2023 मध्ये म्हणजेच यावर्षी ज्या चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घातला त्यापैकी एक म्हणजे शाहरुखचा जवान चित्रपट आहे. आजही हा चित्रपट चर्चांचा भाग आहे. आता चित्रपटात मुख्य नायिकेच्या भूमिकेत दिसून आलेली दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा चर्चेत आली आहे.

समोर आलेल्या माहीतीनुसार, जवानमध्ये नयनताराचा रोल छोटा करुन दीपीकाला भूमिका देण्यात आली आणि त्यामुळे चित्रपटाचे क्रेडिट दीपिकाला देण्यात आल्याने नयनतारा आणि तिचे चाहते नाराज असल्याचे म्हटले जात आहे. आता यामुळेच नयनतारा हिंदी चित्रपटसृष्टीत काम करणार नसल्याचे म्हटले जात आहे. ती इथून पुढे फक्त दाक्षिणात्य चित्रपटात काम करणार असल्याची माहीती समोर आले आहे.

नयनतारा ही दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिला 'लेडी सुपरस्टार' म्हणतात. रजनीकांतची जशी क्रेझ आहे तशीच क्रेझ नयनतारासाठीही आहे. नयनताराने अॅटलीच्या 'जवान' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने शाहरुख खानची पत्नी नर्मदाची भूमिका साकारली होती.

रिपोर्ट्सनुसार, नयनताराने आता ठरवले आहे की ती फक्त साऊथ इंडस्ट्रीत काम करणार आहे. आता ती बॉलिवूडचा कोणताही चित्रपट करणार नाही. अशी माहिती आहे की नयनतारा संजय लीला भन्साळी यांच्या ऑफिसबाहेर स्पॉट झाली होती, त्यानंतर ती भन्साळींच्या चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. 'बैजू बावरा' संदर्भात दोघांमध्ये चर्चा सुरू होती.

नयनतारा आगामी 'इरायवन' या तमिळ चित्रपटात दिसणार आहे. या सिनेमासाठी नयनताराने 10 कोटी रुपये फी घेतल्याचे बोलले जात आहे. 'जवान'साठीही त्यांनी तेवढीच रक्कम घेतली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

ICC ODI World Cup 2027: अखेर ठरलं! वनडे वर्ल्ड कपचा थरार 'या' तारखेपासून रंगणार; अंतिम सामन्याचीही तारीख निश्चित

Horoscope: रविवार ठरणार खास! वृषभ-कर्कसह 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा, घरात सुख-समृद्धी अन् नोकरीत प्रमोशनचे संकेत

SCROLL FOR NEXT