HBD Nayanthara Dainik Gomantak
मनोरंजन

HBD Nayanthara : 39 वर्षांची नयनतारा आहे इतक्या कोटींची मालकीण...

अभिनेत्री नयनतारा 18 नोव्हेंबर रोजी तिचा 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. नयनतारा तिच्या सौंदर्य आणि अभिनयासाठी ओळखली जाते आज पाहुया तिच्या नेटवर्थबद्दल.

Rahul sadolikar

HBD Nayanthara : अभिनेत्री नयनताराने 2023 हे साल चांगलंच गाजवलं. शाहरुख खानसोबत जवानमध्ये नयनताराने आपल्या अभिनय आणि सौंदर्याने सगळ्यांनाच घायाळ केलं आहे. 18 नोव्हेंबर रोजी नयनतारा आपला 39 वा वाढदिवस साजरा करत आहे.

नयनतारा

नयनताराचा जन्म 19 नोव्हेंबर 1984 रोजी झाला आहे. नयनतारा इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रीपैकी एक आहे. नयनतारा तिच्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकत असते. नयनतारा ही आघाडीची अभिनेत्री असून ती देशातील सर्वात श्रीमंत नायिकांपैकी एक आहे.

नयनताराची संपत्ती

एका रिपोर्टनुसार, नयनताराची एकूण संपत्ती 200 कोटी रुपये आहे. नयनताराकडे 100 कोटींचे घर आहे. तिच्याकडे चार लक्झरी प्रॉपर्टीज आहेत. तमिळनाडू पासून ते मुंबईपर्यंत अनेक ठिकाणी नयनताराकडे प्रॉपर्टीज आहे.

विघ्नेशसोबत राहते अलीशान फ्लॅटमध्ये

नयनतारा तिच्या नवरा विग्नेश शिवनसोबत 4 बीएचके फ्लॅटमध्ये राहते. त्या फ्लॅटची किंमत जवळपास 100 कोटींच्या घरात आहे. तिच्या या घरात प्रायव्हेट थिएटर, जिम, स्विमींग पूल सारख्या सुविधा आहेत.

याचसोबत नयनताराचे हैदराबादच्या बंजारा हिल्समध्ये दोन अपार्टमेंट आहे. या घरांची किंमत जवळपास 30 कोटी रुपये आहे. तसेच नयनताराकडे स्वतः चे प्रायव्हेट जेट आहे. तिच्या या जेटची किंमत 50 कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे.

कंपनीची मालकीन

नयनतारा एका प्रोडक्शन कंपनीची सहमालक आहे. ती पती विघ्नेश शिवनसोबत राउडी पिक्चर बॅनर हे प्रोडक्शन हाऊस चालवते. नयनतारा चित्रपटांशिवाय जाहिरातीमधूनही चांगली कमाई करते. ती एका जाहीरातीसाठी 4-7 कोटी रुपये घेते. एका 50 सेकंदाच्या जाहीरातीसाठी तिने 5 कोटी रुपये मानधन घेतले असल्याचे काही रिपोर्टसमधून समोर आले आहे.

नयनतारा जवानमध्ये

नयनताराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, नयनतारा नुकतीच शाहरुख खानच्या जवान चित्रपटात झळकली होती. तिचा हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती.

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

Navelim: नावेली पंचायतीतील 2 पंच पोर्तुगीज, तक्रारीमुळे अपात्रतेचे संकट; सरपंच निवडणूक लांबणीवर

Gavandali: गवंडाळीतील उड्डाण पुलाच्या कामाला गती द्या! प्रवाशांची मागणी;अरुंद रस्त्यावर अडथळा, वाहनचालकांना त्रास

SCROLL FOR NEXT