Sonu Nigam- K. K. Dainik Gomantak
मनोरंजन

Sonu Nigam: 'तो माझं नाव...' सोनू निगमने दिला के. के. यांच्या आठवणींना उजाळा

Sonu Nigam: सोनू निगम यांनी अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान के. के यांच्याविषयी काही खुलासे केले आहेत.

दैनिक गोमन्तक

Sonu Nigam: काही कलाकार हे नेहमीच चाहत्यांच्या लक्षात राहतात. आता प्रसिद्ध गायक सोनू निगम आता पुन्हा एकदा चर्चांचा भाग बनले आहेत. त्यांनी आपल्या सोशल मिडियावर लोकप्रिय गायक के.के यांच्याविषयी पोस्ट शेअर केली आहे.

'आँखों में तेरी', 'दिल इबादत', 'तू जो मिला' अशी अनेक सुपरहिट गाणी गाणारे गायक के.के. ज्यांच्या आकस्मिक मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला. आजही चाहत्यांना त्यांची गाणी भुरळ पाडताना दिसतात.

आता सोनू निगम यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. मला विश्वास बसत नाही की के के हे जग कायमसाठी सोडून गेला आहे. त्याचा आवाज इथे आहे, तो माझे नाव घेत आहे आणि त्यामुळे मला भरुन आले आहे असे सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करत सोनू निगमने म्हटले आहे.

हा ऑडीओ तेव्हाचा जेव्हा के के सोनू निगम आणि शान सोबतचा एक मजेशीर किस्सा सांगताना दिसत आहे. एक दिग्गज दुसऱ्या दिग्गजाबद्दल बोलताना दिसत आहे. या ऑडीओमध्ये के. के यांनी सोनू निगमच्या आवडत्या गाण्याबद्दलही बोलले आहे.

सोनू निगम यांनी अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान के. के यांच्याविषयी काही खुलासे केले आहेत. ते म्हणतात, 'मला आठवतं केके मला म्हणायचा, मी खूप अंतर्मुख आहे. शान, कुणाल गांजावाला, पापोन, अभिजीत दा, सुरेश वाडकर जी, अनुप जलोटा जी, हरिहरन आणि मी भेटायचो. आम्ही नेहमी एकमेकांसोबत मजा करतो.

आम्ही रोज भेटतो असं नाही, पण जेव्हाही भेटायचो तेव्हा आमचा वेळ चांगलाच गेला. आता के के गेला, आता तो सापडणार नाही, पण तो जेव्हा जिवंत होता तेव्हाही फार कमीवेळा भेटला. मला त्याची आठवण येते.

सोनू निगम पुढे म्हणतात, मला स्वत:ला असे वाटते की देव( God ) तुम्हाला जसे ठेऊ इच्छितो तसे तुम्ही राहिले पाहिजे. जेव्हा आयुष्यात मजा मस्ती देखील केली पाहिजे.

दरम्यान, मे २०२२ मध्ये वयाच्या ५३ व्या वर्षी के के यांचा आकस्मिक मृत्यू झाला. त्यांनी आपल्या २३ वर्षाच्या कारकिर्दीत अनेक गाणी गायली आहेत. यशाच्या सर्वोच्च शिखरावर असताना त्यांचे निधन झाल्याने गुणी गायका( Singer ) ला गमावल्याबद्दल इंडस्ट्री आणि चाहते आजही हळहळ व्यक्त करताना दिसतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

SCROLL FOR NEXT