Sonakshi Sinha  Dainik Gomantak
मनोरंजन

Devdas च्या रंगात रंगली सोनाक्षी सिन्हा, धक धक गर्लच्या 'मार डाला'वर लावले ठुमके,पाहा व्हिडिओ

Sonakshi Sinha Video: बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती माधुरी दीक्षित स्टाईलमध्ये नृत्य करतांना दिसत आहे.

दैनिक गोमन्तक

बी-टाऊनच्या सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक सोनाक्षी सिन्हा तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. इतकेच नाही तर सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावरही अॅक्टीव असते. सोनाक्षी सिन्हा दररोज तिचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अलीकडेच, दबंग अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा एक लेटेस्ट व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती देवदास चित्रपटातील मार डाला गाण्यावर माधुरी दीक्षितप्रमाणे नाचताना दिसत आहे.

सोनाक्षी सिन्हाने नुकताच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सोनाक्षी सिन्हाने देवदासमधील माधुरी दीक्षितच्या मार डाला गाण्याचा लूकमध्ये दिसत आहे.

सोनाक्षी सिन्हा हिरव्या रंगाच्या लेहेंगा चुनरीच्या पारंपारिक शैलीत कहर करताना दिसत आहे. इतकेच नाही तर सोनाक्षीने या व्हिडिओमध्ये देवदास चित्रपटातील मार डाला गाणेही टाकले आहे, ज्यावर सोनाक्षी नाचताना दिसत आहे.

सोनाक्षी सिन्हाच्या या व्हिडिओची स्तुती करावी तितकी कमी आहे, कारण तिचा लूक आणि माधुरी स्टाईलमधील डान्स दोन्ही प्रेक्षणीय आहे. त्यामुळेच सोनाक्षी सिन्हाचा हा लेटेस्ट व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सोनाक्षीच्या या व्हिडिओला चाहते खूप लाइक आणि कमेंट करत आहेत.

सोनाक्षी सिन्हाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, सोनाक्षी सिन्हा बऱ्याच काळापासून कोणत्याही चित्रपटात दिसलेली नाही. पण आगामी काळात सोनाक्षी सिन्हा बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारसोबत डबल एक्सएल या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात सोनाक्षीशिवाय हिंदी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेत्री हुमा कुरेशी देखील दिसणार आहे. सोनाक्षी सिन्हाचा हा चित्रपट पुढच्या वर्षी रिलीज होऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amazon Saleमध्ये iPhone 16 वर मोठी बचत; 18 हजारांपर्यंत स्वस्त मिळणार Appleचा फोन, ऑफरचा 'असा' घ्या फायदा

ICC ODI Rankings: आयसीसी वनडे रँकिंगमध्ये भारतीय फलंदाजांचा दबदबा; टॉप-10 मध्ये 4 खेळाडू, केएल राहुलची मोठी झेप

FC Goa ISL Squad: एफसी गोवाचा 'आयएसएल' संघ जाहीर; शनिवारी चेन्नईयीन एफसीविरुद्ध पहिली लढत

Goa Fish Market: म्हापसा मासळी मार्केटला मुख्यमंत्र्यांची अचानक भेट; विक्रेत्यांच्या समस्यांवर आठवडाभरात उपायांचे निर्देश

Goa Tuber Vegetables Market: कंदमुळांना आता 'भाव' येणार! आवक घटली; पाऊस आणि रानटी जनावरांचा उत्पादनाला फटका

SCROLL FOR NEXT