Bachchan Family Dainik Gomantak
मनोरंजन

...म्हणून बच्चन कुटूंबिय मुलगी श्वेताची आठवण काढत नाही!

जया बच्चन यांनी सांगितलं की, त्यांच्या घरात आता ते त्यांची मुलगी श्वेताला कधीही मिस करत नाही.

दैनिक गोमन्तक

फिल्मी दुनेयेती सेलिब्रिटींचे लाखो चाहते आहेत. हे चहाते आपले आवडते सेलिब्रिटी काय करतात? कुठे जातात याची सर्व माहिती आवडीने जाणून घेतात. एवढेच काय तर ते घरी कसं आयुष्य जगतात हे देखील चाहत्यांना जाणून घ्यायला फार आवडते. बहुतेक सेलिब्रिटीज् हे सोशल मीडियावरती ऍक्टीव्ह असतात.

त्यामुळे ते त्यांच्याबद्दल काहीना काही सोशल मीडियावरती पोस्ट करत असतात. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे बॉलिवूड विश्वातील मोठे नाव आहे. त्यांनी आपल्या अभिनयाने लाखो लोकांची मने जिंकली आहेत. अजूनही लाखो चाहत्यांच्या मनात त्यांनी घर केलं आहे. त्यामुळे ते आपल्या खासगी आयुष्यात काय करतात हे देखील चाहत्यांना जाणून घ्यायला आवडते.

हल्लीच जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी कुटुंबाबद्दल एक मोठ वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे सर्वत्र चर्चा सुरू आहे. या मुलाखतीत जया बच्चन यांनी सांगितलं की, त्यांच्या घरात आता ते त्यांची मुलगी श्वेताला कधीही मिस करत नाही.

यामुळे लोकांना प्रश्न पडले आहेत की, जया बच्चन यांनी असं वक्तव्य का केलं असावं? स्वत:च्या मुलीबद्दल त्या असं का म्हणाल्या असाव्यात? त्यांनी हे वक्तव्य वेगळ्याच कारणावरुन केलं आहे. खरंतर त्यांनी सुन ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अमिताभ बच्चन यांच्या नात्याबद्दल बोलताना हे वक्तव्य केलं आहे.

बॉलिवूडची सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय ही आता बच्चन कुटुंबाची सुन आहे. तिचे सासरे अमिताभ बच्चन यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांसोबत देखील उत्तम बॉन्डिंग आहे. एका मुलाखतीदरम्यान जया बच्चन यांनी वक्तव्य केलं की, ऐश्वर्या बच्चन कुटुंबाची लाडकी सून आहे. अमिताभ तिला अगदी आपल्या मुलीप्रमाणे वागवतात. श्वेतीची जागा ऐश्वर्याने घेतली आहे.

ढे जया बच्चन म्हणाल्या की, ती अमिताभ यांना कधीही त्याची सुन असल्याची जाणीव करु देत नाहीत, ती त्यांची मुलगीच आहे आणि तिने अमिताभ बच्चन यांच्या मुलीची म्हणजेच श्वेताची जागी घेतली आहे. ज्यामुळे श्वेताची आम्हाला घरामध्ये कधीही आठवण येत नाही.

ऐश्वर्या आणि अमिताभ यांची बॉन्डिंग पब्लिक प्लेसमध्ये देखील चांगलीच पाहायला मिळाली आहे. अनेक अवॉर्ड शोमध्ये ऐश्वर्या अमिताभ यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेताना ऐश्वर्या दिसली आहे. अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय यांच्या लग्नानंतर जया बच्चन करण जोहरच्या (Karan Johar) चॅट शोमध्ये पोहोचल्या, जिथे त्यांनी ऐश्वर्याचे जोरदार कौतुक केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT