Release Date of 'Singham 3' has come up Dainik Gomantak
मनोरंजन

Singham Again Poster Release: सिंबाचा फर्स्ट लूक आला समोर, नेटकरी म्हणाले...

Singham Again Poster Release: आता सिंबाचे हे पोस्टर पाहून नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

Singham Again Poster Release: रणवीर सिंग रोहित शिट्टीच्या 'सिंघम अगेन' या चित्रपटात सिम्बाची भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. रोहित शेट्टीच्या पुढील चित्रपट 'सिंघम 3'मध्ये रणवीर सिंग पुन्हा एकदा संग्राम भालेराव म्हणजेच 'सिम्बा'ची भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. 'सिम्बा'च्या लूकमध्ये 'सिंघम 3'चे हे पोस्टर पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली दिसून येत आहे.

रणवीरने शेअर केले पोस्टर

या पोस्टरमध्ये 'सिम्बा'च्या भूमिकेत इन्स्पेक्टर संग्राम भालेराव पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक दिसत आहेत. या पोस्टरमध्ये लाल पार्श्वभूमीसह हनुमानजींचा मोठा फोटोही दिसत आहे. हे पोस्टर प्रेक्षकांच्या भरपूर मनोरंजनाची हमी देत ​​आहे. हे शेअर करताना रणवीरने लिहिले आहे, 'सर्वात खोडकर, सर्वात अनोखा, आला रे आला, सिम्बा आला.' आता सिंबाचे हे पोस्टर पाहून नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अजय देवगणनेही शेअर केले पोस्टर

अजय देवगणनेही हे पोस्टर शेअर करत 'माझ्या पथकातील सर्वात खोडकर अधिकारी' असे लिहिले आहे.

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2'शी टक्कर

रोहित शेट्टीने चित्रपटाचे हे पोस्टर शेअर करत लिहिले, 'आमच्या सर्वांचा आवडता नॉटी सिम्बा आला आहे.' हे पोस्टर पाहिल्यानंतर चाहत्यांनी त्याचे खूप कौतुक केले आहे. या चित्रपटात अजय देवगण व्यतिरिक्त दीपिका पदुकोण देखील दिसणार आहे. रोहित शेट्टीचा चित्रपट 'सिंघम अगेन' पुढील वर्षी १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित होत आहे. बॉलिवूडचा हा दमदार चित्रपट दक्षिणेतील अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2'शी टक्कर देत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Petrol Diesel Prices In Goa: महाराष्ट्र, कर्नाटकपेक्षा गोव्यात पेट्रोल - डिझेल स्वस्त; जाणून घ्या ताजे भाव

Junta House: ‘पणजीतील जुन्‍ता हाऊस 30 दिवसांत रिकामे करा’, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; इमारतीचे होणार नूतनीकरण

Goa News Live: सराईत गुंड 'टारझन' विरोधात हत्यार कायद्याखाली गुन्हा; अड्डयावर सापडली तलवार

DSSY चे 13 हजार बोगस लाभार्थी! समाजकल्याण खात्यातर्फे पडताळणी; 50 कोटी रुपयांची वसूली

Gas Cylinder Seizure: 1021 पैकी 485 सिलिंडर रिकामे, वजनमाप खात्‍याकडून मोजणी; अहवाल मिळाल्‍यानंतर पोलिस करणार कारवाई

SCROLL FOR NEXT