Shreya Ghoshal Birthday: Dainik Gomantak
मनोरंजन

Shreya Ghoshal Birthday: 'या' देशात फक्त ऐकली जातात श्रेयाची गाणी,वाचा एका क्लिकवर

या देशातील एका शहरात श्रेयाच्या वाढदिवसाला फक्त श्रेयाची गाणी वाजवली जातात.

दैनिक गोमन्तक

Shreya Ghoshal Birthday: आपल्या गोड आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी लोकप्रिय गायिका श्रेया घोषालचा आज वाढदिवस आहे. तिचा जन्म दुर्गापूर येथील बंगाली कुटुंबात झाला.

श्रेयाने 'सारेगमप' या शोमध्ये सहभाग घेतला होता. तिने हा शो जिंकला आणि तिचे संपूर्ण आयुष्य बदलुन गेले आहे. तिने मराठी, कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू, बंगाली, आसामी आणि काही भाषांमध्ये गाणी गायली आहेत.

पण तुम्हाला माहिती आहे का चक्क एका देशात 'श्रेया घोषाल दिन' साजरा केला जातो. चला जाणून घेऊया हा देश कोणता आहे.

अमेरिकेतल्या ओहिओ गावात 26 जून हा दिवस ‘श्रेया घोषाल डे’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी तिची गाणी ऐकली जातात. 2010 मध्ये ओडियोचे तत्कालीन राज्यपाल टेड स्ट्रीकलँड यांनी श्रेयाला हा सन्मान दिला.

श्रेयाने 'देवदास' चित्रपटातील 'सिलसिला' या गाण्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटातील 'बैरी पिया' या गाण्यासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

श्रेयाने 2015 साली तिचा बॉयफ्रेण्ड शिलादित्य सोबत विवाहगाठ बांधली. 2021 साली तिला मुलगा झाला. त्यानंतर श्रेयाचं 'बारिश आयी है' हे गाण रिलीज होणार आहे, यात करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश मुख्य भूमिकेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa IDC E Auction: गोव्यात 50 भूखंडांचा ई-लिलाव; वेर्णा, लाटंबार्से अन् किटलातील भूखंडांसाठी 'आयडीसी'ची नोटीस जारी

Goa Grand Alliance: 'जनभावनेला प्राधान्य, घाईगडबडीत निर्णय नाही'; ग्रँड अलायन्सवर विजय सरदेसाईंची भूमिका स्पष्ट

खरी कुजबुज: 'ते' नेते विजयना स्‍वीकारणार?

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर 2.15, 2.28 की 2.57? 8व्या वेतन आयोगात बेसिक पे किती वाढणार, तुमचा पगार आणि एरियर कसा मोजला जाणार? पाहा संपूर्ण गणित

Goa Foundational Learning Survey: पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांचा आता 'लर्निंग सर्व्हे'; वाचन, लेखन अन् गणितातील पायाभूत कौशल्यांची कमतरता शोधणार

SCROLL FOR NEXT