Sidhu Moose Wala shot dead LIVE UPDATES Dainik Gomantak
मनोरंजन

Sidhu Moose Wala shot dead LIVE UPDATES: मिका सिंग म्हणाला, 'मला माझ्या पंजाबी म्हणवायला लाज वाटते'

प्रसिद्ध गायक मिका सिंगने सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला.

दैनिक गोमन्तक

प्रसिद्ध गायक सिद्धू मूसवाला (Sidhu Moose Wala) यांचा दिवसाढवळ्या गोळ्या झाडून गुंडांनी हत्या केली आहे. पंजाबमधील मानसा जिल्ह्यात ही भीषण घटना घडली होती. 28 वर्षीय सिद्धू मुसेवाला यांच्या निधनाची बातमी समजताच मनोरंजन विश्वात आजही शोककळेचे दृश्य आहे. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर सर्वांनाच धक्का बसला. (Sidhu Moose Wala shot dead LIVE UPDATES Mika Singh says I am ashamed to call myself Punjabi)

सरकारने सुरक्षा काढून घेतल्याच्या 24 तासांच्या कमी कालावधीनंतर, गायक-राजकारणी बनलेल्या सिद्धू मूसवाला यांची पंजाबमधील मानसा येथील त्यांच्या मूळ गावाजवळ गुंडांनी गोळ्या घालून हत्या केली होती. मुसेवाला यांनी 20 फेब्रुवारीच्या विधानसभा निवडणुकीसाठी () मानसातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूकत पदार्पण केले होते. तर तो मूळचा मुसा गावचा होता.

'मला स्वतःला पंजाबी म्हणवायला आता लाज वाटते'

सिद्धू मुसेवालाच्या हत्येने सर्वांनाच धक्का बसला असून, सेलिब्रिटी सतत त्यावर सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आहेत. प्रसिद्ध गायक मिका सिंगने (Mika Singh) सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला. मिकाने लिहिले आहे की, 'मी नेहमी म्हणतो की मला पंजाबी असल्याचा अभिमान आहे, पण आज मला ते सांगायला ही लाज वाटते आहे.'

मुसेवाला कोणी मारला?

पंजाबमधील गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मूसवाला यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली. मुसेवाला कोणी मारला? खुनाचे कारण काय? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पंजाब पोलिसांनी 3 सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: शापोरा – हणजूण येथून ११ वर्षीय मुलगा दोन दिवसांपासून बेपत्ता, शोध सुरु

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT