Kapil Sharma Show  Dainik Gomantak
मनोरंजन

The Kapil Sharma Show: 'द कपील शर्मा शो' ला आणखी एका कलाकाराने केले अलविदा

The Kapil Sharma Show: आत्ताच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान, कृष्णा अभिषेकने त्याच्यात आणि कपिल शर्मामध्ये कोणतेही वाद किंवा मतभेद नसल्याचे सांगितले आहे.

दैनिक गोमन्तक

The Kapil Sharma Show: द कपील शर्मा शो हा सोनी टीव्हीवरील हिंदी कॉमेडी कार्यक्रम मागच्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आला आहे. या कार्यक्रमातील सगळ्याच कलाकारंना त्यांच्या कलेमुळे नेहमीच प्रेक्षकांचे प्रेम मिळते.

नेहमीच चर्चेत राहणाऱ्या कार्यक्रमांपैकी एक कपील शर्मा शो आहे. मात्र आता कृष्णा अभिषेक आणि चंदन प्रभाकरनंतर सिद्धार्थ सागरसुद्धा शोमधून बाहेर पडला आहे. द कपील शर्मा( Kapil-Sharma) शोच्या नवीन सीझनमध्ये अनेक नवीन कलाकार दिसले होते. त्यामध्ये सिद्धार्थ सागरदेखील होता.

सिद्धार्थ सागर ने 'सेल्फी मौसी' आणि 'उस्ताद घरचोरदास' या भूमिकांमधू्न प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थने आपली फी वाढवण्यासाठी मेकर्सकडे मागणी केली होती. मात्र मेकर्स त्यासाठी तयार न झाल्याने सिद्धार्थने शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

जेव्हा सिद्धार्थला कपील शर्मा शोची ऑफर मिळाली होती तेव्हा तो दिल्लीहून मुंबईला आला होता. आता सिद्धार्थ पुन्हा दिल्लीला गेल्याचे सांगण्यात येत आहे. सिद्धार्थच्याआधी भारती सिंह, कृष्णा अभिषेक, सुनील ग्रोवर, अली असगर, उपासना सिंह आणि चंदू चायवाल्याची भूमिका साकारणाऱ्या चंदन प्रभाकरसुद्धा शो सोडला आहे.

दरम्यान, आत्ताच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान, कृष्णा अभिषेकने त्याच्यात आणि कपिल शर्मामध्ये कोणतेही वाद किंवा मतभेद नसल्याचे सांगितले आहे. येणाऱ्या काळात ते पुन्हा एकत्र दिसू शकतात असे कृष्णा अभिषेकने म्हटले आहे.

सिद्धार्थ शोमधून बाहेर पडल्यानंतर कृष्णा शोमध्ये येणार का? कि सिद्धार्थच्या मागण्या पुर्ण करत त्याला शो मध्ये परत बोलवणार असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले असल्याचे सोशल मिडियावर दिसून येत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

SCROLL FOR NEXT