Kiara Advani and Sidharth Malhotra Dainik Gomantak
मनोरंजन

Sidharth Malhotra-Kiara Advani: सिद्धार्थ अन् कियाराने अ‍ॅनिव्हर्सरी अशी केली साजरी

Sidharth Malhotra-Kiara Advani: राम चरणसोबत 'गेम चेंजर'मध्ये दिसणार आहे. हा एक ॲक्शन ड्रामा आहे, जो तेलुगूसह तमिळ आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

दैनिक गोमन्तक

Sidharth Malhotra-Kiara Advani: बॉलीवूडचे कलाकार हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी ते त्यांच्या चित्रपटामुळे कधी ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. आता बॉलीवूडमधील लोकप्रिय कपल कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत.

गेल्या वर्षी हे दोघे कलाकार लग्नबंधनात अडकले होते. आता त्याच्या वर्षपूर्तीनिमित्त म्हणजेच लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्ताने ते चर्चांचा भाग बनले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, त्यांनी आपला खास दिवस आपल्या कुटुंबियांसोबत साजरा केला आहे.७ फेब्रुवारीपूर्वीच सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी मुंबईहून दिल्लीला निघाले होते. लग्नाचा पहिला वाढदिवस तो आपल्या कुटुंबासोबत साजरा करणार असल्याचं म्हटलं जात होतं. आता पार्टीचे काही फोटो समोर आले आहेत.

याबरोबरच, कियाराने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचा आणि सिद्धार्थचा हॉर्स राइडचा फोटो शेअर केला आहे. त्यावर सिद्धार्थने कमेंट करत कियाराला खास शुभेच्छा दिल्या आहेत. तो म्हणतो- 'आयुष्य नावाच्या राइमध्ये माझी उत्तम जोडीदार झाल्याबद्दल मनापासून धन्यवाद! कारण प्रवास किंवा पोहचण्याच्या ठिकाणापेक्षा सोबत जास्त महत्वाची असते. हॅप्पी अॅनिव्हर्सरी माय लव्ह!'

सिद्धार्थ-कियाराने ७ फेब्रुवारी २०२३ रोजी राजस्थानमधील जैसलमेरच्या सूर्यगडमध्ये लग्नगाठ बांधली होती. या खाजगी विवाह सोहळ्याला फक्त जवळचे लोकच हजर होते. त्यांची पहिली भेट 'लस्ट स्टोरी'च्या रॅप-अप पार्टीमध्ये झाली होती, पण 'शेरशाह' चित्रपटाच्या सेटवर ते एकमेकांच्या प्रेमात पडल्याचे म्हटले जाते.

कियाराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, राम चरणसोबत 'गेम चेंजर'मध्ये दिसणार आहे. हा एक ॲक्शन ड्रामा आहे, जो तेलुगूसह तमिळ आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याआधी कार्तिक आर्यनसोबत 'सत्यप्रेम की कथा'मध्ये दिसली होती. असेही म्हटले जात आहे की ती हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरसोबत 'वॉर 2'चा भाग असेल.

सिद्धार्थ मल्होत्रा ​​बद्दल बोलायचे तर तो रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलिस फोर्स' या वेबसिरीजमध्ये शेवटचा दिसला होता. येत्या काही काळात तो 'योद्धा' या ॲक्शन-थ्रिलर चित्रपटातून तो पुन्हा प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात! कारची दुचाकीला धडक, महिलेचा जागीच मृत्यू

Team India: इंग्लंड दौरा संपला, आता टीम इंडिया वेस्ट इंडिजशी करणार दोन हात; मायदेशात खेळणार कसोटी मालिका

Goa Assmbly: थकबाकीदारांसाठी प्रीपेड स्मार्ट मीटर बसवा, आमदार निलेश काब्राल यांची मागणी; वाचा दिवसभरातील घडामोडी

नाव, आडनावात बेकायदेशीरपणे बदल कराल तर खबरदार; तीन वर्षापर्यंत होऊ शकते शिक्षा, अधिवेशनात लक्षवेधी

IND vs ENG: रवींद्र जडेजाची गोलंदाजी अन् जो रुटचा रेकॉर्ड, रचला नवा इतिहास; अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिलाच!

SCROLL FOR NEXT