Siddhartha Shukla Dainik Gomantak
मनोरंजन

बिग बॉस फेम सिध्दार्थ शुक्लाचं निधन

एवढ्या कमी वयामध्ये या नवोदित अभिनेत्याच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

दैनिक गोमन्तक

बिग बॉस फेम सिध्दार्थ शुक्लाचं (Siddhartha Shukla) निधनामुळे बॉलिवूडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. एवढ्या कमी वयामध्ये या नवोदित अभिनेत्याच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. ह्रदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात येत आहे.

बहुचर्चित टीव्ही आणि चित्रपट अभिनेता सिद्धार्थ शुक्ला,जोअनेक काळ चालणाऱ्या टीव्ही शो "बालिका वधू" मधील त्याच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे, त्याचबरोबर बिग बॉसच्या १३ वे सीजन आपल्या अनोख्या गेमने गाजवत ज्याने हा खिताब आपल्या नावावर केला होता मात्र आज जीवनाच्या पटलावर तो हरला आणि वयाच्या 40 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला आहे.

सिद्धार्थ शुक्ल नेट वर्थ

Caknowledge.com च्या मते, दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाची नेट वर्थ चांगली होती. 2020 पर्यंत सिड ची निव्वळ संपत्ती $ 1.5 दशलक्ष होती, जी 11 कोटी रुपयांच्या वर होती. आणि विशेष म्हणजे टीव्ही अभिनेत्यासाठी ही रक्कम मोठी असल्याचे म्हटले जाते. सिद्धार्थ शुक्लाला ही कमाई टीव्ही शो आणि मोठ्या ब्रँडच्या जाहिरातींमधून मिळत होती. सिद्धार्थ जेवढी कमाई करत होता तेवढ्याच प्रमाणात तो दानधर्मही करत होता. सिद्धार्थ सामाजिक कार्यात उत्स्फूर्तपणे भाग घेत असे.

अभिनेत्याचे घर आणि वाहने

सिद्धार्थचे मुंबईत एक घर होते, जिथे तो आपल्या कुटुंबासोबत राहत होता, त्याने हे घर नुकतेच विकत घेतले आहे. सिध्दार्थला वाहनांची खूप आवड होती. त्याच्याकडे BMW X5 तसेच हार्ले-डेव्हिडसन फॅट बॉब मोटरसायकल आहे. सिद्धार्थ साधेपणाने जीवन जगत असे. बिग बॉस 13 जिंकल्यानंतर तो खूप लोकप्रिय झाला होता. अलीकडेच सिध्दार्थने डिजिटल पदार्पण केले होते. सिद्धार्थला डिजिटल पदार्पणानंतर बरीच प्रशंसा मिळाली होती. बिग बॉस जिंकल्यानंतर सिध्दार्थला नवी ओळख मिळाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclub Fire: डान्स सुरू असतानाच भडकल्या ज्वाळा; हडफडे क्लबमधील दुर्घटनेचा थरार दर्शवणारा 'तो' Video Viral!

Konkani Word Etymology: ‘बाप’ हा शब्द सध्याच्या कुंळबी भाषेतील ‘आब’ या ‘वडील’ अर्थाच्या शब्दाचे रूप; कोकणी शब्दांचे कुरुंब मूळ

'CM सावंत राजीनामा द्या!', हडफडे दुर्घटनेनंतर काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांवर थेट हल्ला; सत्तेत राहण्याचा अधिकार नाही म्हणत दिला अल्टिमेटम

Goa Ritual Theatre: जेव्हा भक्ताच्या अंगात ‘भार’ येतो, तेव्हा तो सामान्य माणूस न राहता देवतेचे रूप घेतो, हेच मूळ 'विधीनाट्य'

Pooja Naik: 'पूजा नाईक'सारख्या व्यक्तीकडे 8 कोटी रुपये सापडतात, याचा अर्थ काय?

SCROLL FOR NEXT