HBD Siddhant Chaturvedi  Dainik Gomantak
मनोरंजन

HBD Siddhant Chaturvedi : अहो खरंच ! 'पठाण'मध्ये जॉन अब्राहमने केलेली भुमीका या अभिनेत्याला मिळाली होती...

गली बॉय फेम अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी याचा आज वाढदिवस..सिद्धार्थचे नाव पठाणशी जोडले जाणार होते पण....

Rahul sadolikar

डॅशिंग सिद्धांत चतुर्वेदी आज त्याचा 30 वा वाढदिवस साजरा करत आहे, म्हणजेच 29 एप्रिल. अभिनेता त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये दोन वेब सिरीजमध्ये दिसला. पण गली बॉय (2019) मधील त्याच्या अभिनयाने तो घराघरात नावारूपाला आला  . तेव्हापासून, त्याने आत्तापर्यंत 6 चित्रपट केले आहेत, त्यापैकी 2 अजुन रिलीज झालेले नाहीत. आ

मिळालेल्या माहितीनुसार, “शाहरुख खानच्या  पठाणमध्ये जिमची निगेटिव्ह भूमिका साकारण्यासाठी सिद्धांत चतुर्वेदी हीच पहिली पसंती होती . आदित्य चोप्राच्या यशराज फिल्म्सच्या या ब्लॉकबस्टरमध्ये सिद्धांत चतुर्वेदीच दिसणार होता.  

निर्मात्याने त्याला  बंटी और बबली 2  (2021) साठी साइन केले होते, ज्यात सैफ अली खान, राणी मुखर्जी आणि शर्वरी वाघ सह कलाकार होते. त्याला असे वाटले की सिद्धांत चतुर्वेदी एक उत्तम अभिनेता आहे आणि पठाणमधील खलनायकाच्या भूमिकेसाठी तो योग्य पर्याय असू शकतो . तसेच, तो शारीरिकदृष्ट्या सुदृढ आहे आणि शाहरुख खानसोबतच्या समोरासमोरच्या सीन्समध्ये तो नक्कीच उठून दिसेल.”

सूत्रांनी सांगितल्यानुसार, “सिद्धांत चतुर्वेदी या ऑफरने साहजिकच भारावून गेला होता आणि आदित्य चोप्रा सारख्या निर्मात्याने त्याला इतक्या मोठ्या चित्रपटात अशी प्लम रोल ऑफर केल्याबद्दल त्याला अभिमान वाटला होता. 

पण, त्याला आता नायक-आधारित भूमिका करायच्या आहेत असे वाटल्याने खूप विचार करून आणि विचारपूर्वक नकार दिला. त्याच्या कारकिर्दीत एवढ्या लवकर निगेटिव्ह भूमीका करणे हे पटत नसावे. म्हणून, त्याने ऑफर नाकारण्याचा निर्णय घेतला. ”

त्यानंतर जॉन अब्राहमला जिमच्या भूमिकेसाठी अप्रोच करण्यात आले. त्याने ते स्वीकारले आणि त्याच्या कामासाठी त्याचं प्रचंड कौतुकही झालं. पठाणमध्ये  दीपिका पदुकोणचीही भूमिका होती आणि सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित होता. 

हे 25 जानेवारी 2023 रोजी रिलीज झाले आणि अनेक बॉक्स ऑफिस रेकॉर्ड तोडले. हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट आहे.

सिद्धांत चतुर्वेदीने लाइफ सही है या वेब सीरिजसह  इनसाइड एजसह पदार्पण केले . गली बॉयमध्ये त्याने  एमसी शेरची भूमिका साकारली होती. रणवीर सिंग-आलिया भट्ट स्टारर या चित्रपटात सहाय्यक भूमिका असूनही, सिद्धार्थने मोठी छाप सोडली. सिद्धांत नंतर बंटी और बबली 2 मध्ये दिसला होता,   

याशिवाय तो दीपिका पदुकोण-अनन्या पांडे स्टारर  गेहराईयान  (2022) आणि फोन भूत  (2022), या चित्रपटात दिसला होता. कॅटरिना कैफ आणि ईशान खट्टर यांच्यासोबतही त्याने सह-कलाकार म्हणुन काम केले आहे. सिद्धांत चतुर्वेदीचा युध्रा हा आगामी चित्रपट आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT