Shraddha Kapoor's New Movie Trailer Out Dainik Gomantak
मनोरंजन

Shraddha Kapoor : "तू झुठी मै मक्कार"चा ट्रेलर पाहुन श्रद्धाने फॅन्सना विचारला अजब प्रश्न...

अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आगामी "तू झुठी मै मक्कार" हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

श्रद्धा कपूर हे बॉलिवूडमधलं असं नाव आहे जे अल्पावधीतच मोठं झालं. सरळ साध्या अशा आशिकी - 2 च्या नायीकेपासुन ते थेट दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरची आव्हानात्मक भूमीका करण्यापर्यंत श्रद्धा सर्वच व्यक्तीरेखेत कमालीची यशस्वी झाली आहे. Shraddha Kapoor's New Movie Trailer Out

श्रद्धा कपूरच्या 'तू झूठी मैं मक्कार' या आगामी चित्रपटाबद्दल सर्वत्र चर्चा रंगात असताना, श्रद्धाने तिच्या इंस्टाग्रामवर क्वेश्चन ऑफ द ईयर अशी पोस्ट करत, '२०२३ मध्ये प्रेमात काय अवघड आहे'? असे विचारले.

तिच्या या प्रश्नावर प्रेक्षकही बुचकळ्यात पडले आहेत.सध्या श्रद्धा 'तू झूठी मैं मक्कार' या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. .

ट्रेलरने प्रेक्षकांना चित्रपटात काय बघायला मिळेल? याची कल्पना आली आहे. दरम्यान 'तू झूठी मैं मक्कार'हा चित्रपट प्रेम आणि नातेसंबंधांवर काय कमेंट करतो हे बघणं जास्त इंटरेस्टींग असणार आहे तसेच, या सिनेमातून रणबीर आणि श्रद्धाची जोडी प्रथमच दर्शकांच्या भेटीला येणार आहेत.

काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या टायटल अनाऊंसमेंट व्हिडिओमध्ये दोघांच्या अफलातून केमिस्ट्रीची झलक पाहायला मिळाली. आता, श्रद्धाच्या या प्रश्नाचे उत्तर देणे थोडे कठीण असले तरी तिच्या या प्रश्नाने प्रेक्षकांमधील ट्रेलरची अपेक्षा काही प्रमाणात नक्कीच वाढवली आहे.

लव फिल्म्सचे लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित 'तू झूठी मैं मक्कार'या चित्रपटाचे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले आहे. तसेच, टी-सिरीजचे गुलशन कुमार आणि भूषण कुमारद्वारा प्रस्तुत हा चित्रपट, 8 मार्च 2023 रोजी होळीच्या दिवशी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa School Closed: गोव्याला मुसळधार पावसाने झोडपले; शुक्रवारी शाळांना सुट्टी जाहीर

Tripti Dimri: 'ॲनिमल' फेम तृप्ती डिमरी मिस्ट्री बॉयसोबत गोव्यात! व्हायरल फोटोंमुळे नात्याची चर्चा, हा मुलगा कोण?

Video: भावाचा विनोद पडला महागात, आईस्क्रीम विक्रेत्यानं लाथाबुक्क्यांनी मारलं; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Diogo Jota Dies: क्रिडाविश्वात खळबळ; स्टार फुटबॉलपटूचा कार अपघातात मृत्यू, 10 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

‘आठ दिवसांत चौकशी सुरु करा, अन्यथा...’; आजी – माजी आमदरांच्या गांजा आरोपावरुन काँग्रेस खासदाराचा मुख्यमंत्र्यांना इशारा

SCROLL FOR NEXT