Shraddha Kapoor  Instagram /@Shraddha
मनोरंजन

... म्हणून 16 वर्षाच्या श्रद्धाने नाकारली होती भाईजानची ऑफर

श्रद्धाला कपूरला मानसशास्त्रज्ञ (Psychologist) व्हायचे होते

दैनिक गोमन्तक

बॉलीवुड अभिनेत्री श्रद्धा कपूरने आपल्या अभिनयाने बॉलीवुडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. श्रद्धने 2010 साली "तीन पत्ती" (Teen Patti) या चित्रपटातून बॉलीवुडमध्ये पदार्पण केले होते. 2013 मध्ये आलेला "आशिकी 2" चित्रपटाच्या माध्यमातून तिला प्रसिद्धी मिळाली. सलमान खानने (Salman Khan) श्रद्धा कपूरला ऑफर दिली होती, पण तिने नाकारली होती.

श्रद्धा कपूरला (Shraddha Kapoor) सलमान खानने वयाच्या 16व्या वर्षी शाळेतील ड्रामामध्ये अॅक्टिंग करतांना पहिले होते. श्रद्धाच्या अभिनयाचा सलमान फॅन झाला होता. यामुळे त्याने श्रद्धाला बॉलीवुडमध्ये (Bollywood) पदार्पण करण्याची ऑफर दिली. त्या काळात श्रद्धाला शिक्षण घ्यायचे होते. श्रद्धाला मानसशास्त्रज्ञ (Psychologist) व्हायचे होते. त्यामुळे तिने सलमानची ऑफर नाकारली. सलमानची ऑफर नाकारल्यानंतर श्रद्धा परदेशात शिकण्यासाठी गेली. बोस्टन युनिव्हर्सिटीत वर्षभर शिक्षण घेतल्यानंतर ती सुट्टीवर घरी परतली तेव्हा तिची फेसबूक प्रोफाइल पाहून चित्रपट निर्मात्या अंबिका हिंदुजा यांनी चिटपटाची (Movie) ऑफर दिली. पण यावेळी श्रद्धा कपूरला नकर देता आला नाही आणि तिचा "तीन पत्ती" हा पहिला चित्रपट होता.

श्रद्धा कपूरचा पहिला चित्रपट 'तीन पत्ती' बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही. याचा श्रद्धावर खोलवर परिणाम झाला होता, कारण तिने चित्रपटासाठी आपले शिक्षण सोडले होते. पण नंतर तिने कठोर परिश्रम केले आणि इंडस्ट्रीत आपले नाव कमवले. श्रद्धा कपूरच्या प्रोफेशनल लाईफसोबतच तिची पर्सनल लाईफही खूप चर्चेत आहे. सध्या तिचे नाव प्रसिद्ध फॉटोग्राफर (Photographer) रोहनसोबत जोडले जात आहे. याबाबत अभिनेत्रीने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नसले तरी काही वेळापूर्वीच श्रद्धाचे वडील शक्ती कपूर यांनी आपल्या मुलीच्या अफेअरच्या चर्चेवर म्हणाले, 'इंटरनेटवर कोणत्या प्रकारच्या बातम्या येत आहेत हे त्यांना माहीत नाही पण होय., ते आपल्या मुलीच्या पाठीशी आहेत. श्रद्धा कपूर दोन मोठ्या (Shraddha Kapoor New Movies) चित्रपटांमध्ये काम करत आहे. श्रद्धाचे 'चालबाज इन लंडन' (Chaalbaaz In London) आणि 'स्त्री 2' (Stree 2) हे चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT