Shilpa Shetty Latest News Dainik Gomantak
मनोरंजन

सोशल मीडियाला टाटा बाय बाय करणाऱ्या शिल्पा शेट्टीचा जबरदस्त 'कमबॅक'

शिल्पा शेट्टी नव्या अवतारात सोशल मीडियावर परतली आहे. यासोबतच तीने तीच्या आगामी 'निकम्मा' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्याची घोषणा केली आहे.

दैनिक गोमन्तक

Nikamma Trailer Release Date : शिल्पा शेट्टीने वर्ष 2014 नंतर 'हंगामा 2' चित्रपटाद्वारे इंडस्ट्रीत पुनरागमन केले. तिचा हा चित्रपट फ्लॉप ठरला असला तरी आता अभिनेत्रीचे चाहते तिच्या 'निकम्मा' चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्यास अजून काही अवधी आहे, मात्र 'निकम्मा' चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. या नव्या अवताराने शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर कमबॅक केले आहे. शिल्पाचा हा लूक तिच्या आगामी चित्रपटातील आहे.

(Shilpa Shetty's comeback on social media)

नुकतेच शिल्पा शेट्टीने सोशल मीडियापासून ब्रेक घेतला होता. ती मोनोटोनीला कंटाळली होती तिने एक पोस्ट शेअर केली होती की आता ती एका नवीन अवतारासह सोशल मीडियावर परतणार आहे. तर तिचा हा नवा अवतार 'निकम्मा' चित्रपटातून घ्या, ज्यात ती हातात तलवार घेऊन सुपर वुमन लूकमध्ये दिसत आहे.

शिल्पा शेट्टीचे सोशल मीडियावर पुनरागमन

शिल्पा शेट्टीचे सोशल मीडियावर पुनरागमन झाल्यानंतर तिचे चाहते चांगलेच खूश आहेत. निकम्मा चित्रपटाचा हा लूक पाहून शिल्पा शेट्टी या चित्रपटात अ‍ॅक्शन करताना दिसणार असल्याचा अंदाज चाहत्यांकडून बांधला जात आहे. या चित्रपटाचा ट्रेलर 17 मे रोजी रिलीज होणार आहे. शिल्पाने तिच्या लूकसह याची घोषणा केली आहे.

'निकम्मा' चित्रपटात शिल्पा शेट्टीशिवाय अभिमन्यू दासानी, शर्ली सेटिया आणि अभिमन्यू सिंह दिसणार आहेत. हा चित्रपट 17 जून 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अॅक्शन, एन्टरटेनर आणि कॉमेडी चित्रपट 'निकम्मा' रुपेरी पडद्यावर मनोरंजनाचे पॅकेज घेऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट 'हिरोपंती' आणि 'बागी' दिग्दर्शक शब्बीर खान यांच्या दिग्दर्शनाखाली बनला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कोकणात 22 वर्षीय तरुणाने 17 वर्षीय मुलीचा खून का केला? घटनास्थळी सापडली नायलॉनची दोरी, कात्री आणि सॅनिटरी पॅड

Sanguem: ..अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली! सांगेतील माय-लेकीला मिळाला हक्काचा निवारा; मंत्री फळदेसाईंचा पुढाकार

Goa News Live: सुर्ल फेरीबोट कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला; रुपेश नाईक आणि अनिकेत नावेळकरला अटक

'रामा'च्या न्यायासाठी पणजीत काढलेला मोर्चा अवैध असल्याचा आरोप; युरी आलेमाव, विजय सरदेसाई यांच्यासह 450 जणांविरोधात गुन्हा

Goa Coconut Price: नारळ अजून महागच! टोमॅटो, कांदाही भडकला; वाचा ताजे दर

SCROLL FOR NEXT