Shilpa Shetty Dance Video Dainik Gomantak
मनोरंजन

Shilpa Shetty Dance Video: डान्सिंग क्वीन शिल्पा शेट्टीलाही ‘बहरला हा मधुमास नवा...’ गाण्याची क्रेझ, पाहा व्हिडिओ

शिल्पा शेट्टीचा एक डान्स व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

दैनिक गोमन्तक

Shilpa Shetty Viral Dance Video: शिल्पा शेट्टीचा एक डान्स व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातील ‘बहरला हा मधुमास नवा...’ या गाण्यावर थिरकतांना दिसत आहे.

सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण या गाण्यावर रिल्स तयार करुन सोशल मिडियावर शेअर करताना दिसत आहेत. या गाण्याची अक्षरश: सातासमुद्रापार क्रेझ पाहायला मिळत आहे.

शिल्पा शेट्टी ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती सतत तिचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. शिल्पाने काही तासांपुर्वीच अभिनेता अंकुश चौधरी महत्त्वाच्या भूमिकेत असणाऱ्या ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातील “बहरला हा मधुमास नवा” या गाण्याची हूक स्टेप केली आहे. सोशल मीडियावर शिल्पाचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

शिल्पाने हा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. “बहरला हा मधुमास नवा” असे कॅप्शन या व्हिडिओला दिले आहे. तिच्या चाहत्यांनी या व्हिडिओवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. एका यूजरने किती आनंद घेत डान्स करत आहे असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने तिचे कौतुक केले आहे.

‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट 28 एप्रिल रोजी रिलीज झाला आहे. शाहीर साबळे यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे. अभिनेता अंकुश चौधरी याने या चित्रपटात शाहीर साबळे यांची भूमिका साकारली आहे. सना शिंदे व अश्विनी महांगडे या चित्रपटात मुख्य भुमिका साकारली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई देखील केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT