Farhan Akhtar and Shibani Dandekar Dainik Gomantak
मनोरंजन

Birthday Special: शिबानी फरहानची 'प्यार वाली लव्ह स्टोरी'

अभिनेत्री आणि मॉडेल शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) हिचा आज 41वा वाढदिवस आहे.

दैनिक गोमन्तक

अभिनेत्री आणि मॉडेल शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) हिचा आज 41वा वाढदिवस आहे. शिबानीचा जन्म 27 ऑगस्ट 1980 मध्ये पुण्यात झाला. शिबानी 2019 च्या क्रिकेट विश्वचषकाची को-होस्ट देखील होती. आता ती सोशल मीडियावर (Social media) सतत अॅक्टिव्ह असते. बॉलिवूड (Bollywood) स्टर फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर यांच्या चांगली मैत्री असून, ती दोघांचे फोटो नेहमीच सोशल मीडियावरुन शेअर करत असते. शिबानी आणि फरहान यांच्या चांगल्या मैत्रीचे रुपांतर आता प्रेमात झाले आहे. हे आपण आज शिबानीच्या वाढदिवसाच्यानिमित्त जाणून घेऊ...

फरहान अख्तर आणि शिबानी यांची पहिली भेट टीव्हीवरील ‘आय कॅन डू दॅट’ या शोच्या सेटवर झाली. या शो चा फरहान होस्ट होता आणि शिबानी, गुरमीत चौधरी आणि वीजे बानीसह अनेक बॉलीवुड कलाकार या शोमध्ये होते.

या शो नंतरच शिबानी आणि फरहान यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा रंगू लागल्या. नंतर फरहानने स्वत: सोशल मीडियावर दोघांचे फोटो शेअर करत सांगितले की, आम्ही दोघे रिलेशनशिपमध्ये आहोत. तेव्हापासूनच या दोघांनी त्यांचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अनेक ठिकाणी हे एकमेकांच्या सोबत देखील दिसतात.

अशातच तिने स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे ज्यात बॉयफ्रेंड फरहान अख्तरच्या नावाचा टॅटू तिच्या गळ्यावर दिसत आहे. शिबानी दांडेकरने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये हे फोटो शेअर केले आहे. या फोटोत फरहान हे नाव शिबानीच्या गळ्यावर इंग्रजीत लिहिलेलं दिसत आहे. शिबानी आणि फरहान यांना एकमेकांना डेट करून 3 वर्षे झाली आहे. फरहानने यापूर्वी हेअरस्टाइलिस्ट अधुनाशी लग्न केले होते आणि दोघांना शाक्य आणि अकिरा या दोन मुली आहेत.

Shibani Dandekar got her boyfriend Farhan Akhtar's name tattooed on her neck

दरम्यान, कामाच्या आघाडीवर, फरहान अख्तरने त्याच्या दिग्दर्शनाखाली पुढील चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे. 'जी ले जरा' या चित्रपटात प्रियंका चोप्रा, कतरिना कैफ आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. शिबानी दांडेकर बद्दल बोलायचे झाले तर, ती शेवटची वेब सीरिज 'फोर मोअर शॉट्स प्लीज' च्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT