ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन झालं आणि बॉलिवूडसह देशभरात शोककळा पसरली. जवळच्या मित्रांनी आपल्या या लाडक्या मित्राविषयीच्या भावना सोशल मिडीयावर शेअर केल्या.
आता दिग्दर्शक शेखर कपूर यांनीही आपल्या मित्राविषयी भावना व्यक्त करण्यासाठी एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. अत्यंत हळव्या शब्दात शेखर कपूर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत
इन्स्टाग्रामवर शेखर कपूर यांनी एक लांबलचक चिठ्ठी लिहिली की, सतीशच्या मृत्यूशी मी सहमत नाही. "मी अजूनही सतीशच्या जाण्याशी जुळवून घेतोय.. तो गेला , हे मी स्वीकारायला तयार नाही.. कारण आमची कथा अजून अपूर्ण होती.. अजूनही अपूर्ण आहे.. कारण प्रेमाची कहाणी संपत नाही, ती बदलते. शिकवते, शोधते, तुमचे हृदय तोडते, पण तुम्ही आहात...कारण प्रेम आहे..."
शेखर कपूर दिग्दर्शित 'मि. इंडिया', ज्यामध्ये, सतीशजींनी त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात गाजलेल्या पात्रांपैकी एक 'कॅलेंडर' साकारले. चित्रपटातील सतीशचा एक फोटो शेअर करत, शेखर कपूर यांनी त्यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा शेअर केला ज्या भेटीने स्वतःला "तृतीय सहाय्यक दिग्दर्शक ते मुख्य सहाय्यक ते सहयोगी" बनवले.
शेखर कपूर पुढे लिहतात, "मुंबईला पूर आला होता. फ्लाईट पकडण्यासाठी मी जेमतेम विमानतळावर पोहोचलो. मी चेक इन करण्यासाठी लाइनमध्ये थांबलो असताना एक तरुण माझ्याकडे आला.
पूर्णपणे ओला.. मी त्याला आधी पाहिले होते. नेहमी माझ्या ऑफिस बाहेर.. हॅलो म्हणत त्याने चेहऱ्यावर हसू आणले.
मला तेव्हा सतीश म्हणाला 'मी इथे आलो कारण मला माहीत होते की तुम्ही इतरांनी वेढले जाणार नाही. माझ्या परिसरात पूर आला होता आणि मला पोहायला हवे होते. इथे... मला तुझा सहाय्यक दिग्दर्शक व्हायचं आहे' मी नाही कसं म्हणू शकतो? असाच आमचा प्रवास सुरू झाला. तिसरा सहाय्यक दिग्दर्शक, मुख्य सहाय्यक ते सहयोगी दिग्दर्शक."
कॅलेंडर हे पात्र रंगवण्यापलिकडे सतीश कौशिक यांनी शेखर कपूर यांच्या 'मिस्टर' चित्रपटातही असिस्ट केले होते.' दिग्दर्शक शेखर कपूर यांच्यासाठी सतीश कौशिक 'कुटुंब' होते. त्यांनी लिहिले, "सतीश माझ्या कुटुंबाचा भाग बनला. माझ्यासोबत राहिला. भावासारखा.. माझ्या चित्रपटांमध्ये अभिनय केला.. आणि नंतर तो स्वत: दिग्दर्शक झाला.. सतीश नवीन क्षितिजे शोधण्यासाठी जगात गेला. प्रेम कधीच निघून गेलं नाही.. नेहमी पुन्हा एकत्र येण्याची इच्छा असते.."
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.