Sheezan Khan Tunisha Sharma  Dainik Gomantak
मनोरंजन

Sheezan Khan : ईदच्या दिवशी शीजान खानला आली तुनिषाची आठवण...भावुक होत दिल्या अशा शुभेच्छा...

दिवंगत अभिनेत्री तुनिषा शर्माची आठवण आजही शीजानला छळत आहे?

Rahul sadolikar

तुनिषा शर्माचं निधन होऊन ४ महिने उलटले आहेत. शीजान खानला तिच्या कथित आत्महत्या प्रकरणात शिक्षाही झाली आहे. तुरुंगातून बाहेर आल्यापासून तो तुनिषाच्या आठवणीने व्याकुळ होत इन्स्टाग्रामवर सतत वेगवेगळ्या पोस्ट करत असतो. 

आता ईदच्या निमित्तानेही त्याने आपल्या सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी नोट लिहिली आणि त्याची दिवंगत प्रेयसी आणि को-स्टार तुनिषा शर्माची आठवण काढली आहे.

शीझान खानने इंस्टाग्रामवर लिहिले, 'चांद मुबारक त्याला जो डोळ्यांपासून दूर आहे, तो चंद्रही - शीझान खान.' येथे त्याने तुनिशाला चंद्र म्हटले आहे. याशिवाय शीजानने अनेक फोटो असलेली मालिकाही पोस्ट केली आहे. 

ज्यात त्यांच्या 'अली बाबा: दास्तान-ए-काबुल'च्या प्रवासाची झलक आहेत. शेवटचा फोटो त्याचा आणि तुनिषाचा आहे, जिथे दोघेही सेटवर मोठ्याने हसत आहेत.

सध्या 'अली बाबा: दास्तान-ए-काबुल'मध्ये सिद्धार्थ निगमचा भाऊ अभिषेक निगमच्या जागी शीजान खानची निवड करण्यात आली आहे. पण, कथा पूर्णपणे बदलली केली आहे. 

निर्मात्यांना शीजान आणि तुनिशा असलेल्या ट्रॅकमध्ये छेडछाड करायची नव्हती. या शोमध्ये चाहते शीजानला मिस करत असले तरी. काहींनी असेही म्हटले आहे की, जेव्हापासून त्याने शो सोडला तेव्हापासून त्याने तो पाहणेही बंद केले आहे. कारण त्यांना मजा येत नाही.

Sheezan Khan

4 मार्चला शीजान खानची जामिनावर तुरुंगातून सुटका झाली होती. वसई कोर्टाने बॉण्ड भरून घेतला होता आणि बाहेर कुठेही जाऊ नये म्हणून पासपोर्टही जमा केला होता. 

२४ डिसेंबर रोजी अभिनेत्रीच्या कथित आत्महत्या प्रकरणात तिची आई वनिता शर्मा यांनी अनेक गंभीर आरोप केले आणि त्यानंतर पोलिसांनी अभिनेत्याला ताब्यात घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT