Shahu Chhatrapati @JitendraAwhad /Instagram
मनोरंजन

Shahu Chhatrapati: राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर येणारा भव्य मराठी चित्रपट 'शाहू छत्रपती' चे पोस्टर आऊट

Shahu Chhatrapati: राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित 'शाहू छत्रपती' हा लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दैनिक गोमन्तक

गेल्या काही दिवसांपासून अनेक ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस देखील उतरत आहेत. आता महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही इतिहासात मानाचं आणि अभिमानाचं स्थान असलेल्या लोककल्याणकारी राजे राजर्षी शाहू महाराजांच्या (Rajarshi shahu Maharaj) जीवनकार्यावर आधारित एक मराठी चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज आले आहे. (shahu chhatrapati grand marathi movie rajarshi shahu maharaj life wok poster out)

'शाहू छत्रपती' या चित्रपटाच्या (Movie) पोस्टरचे अनावरण काल करण्यात आले आहे. पोस्टर अनावरण सोहळ्याला या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आणि महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांची उपस्थिती होती. डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यासह शाहूंचे चरित्र लिहिणारे प्रसिद्ध इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार, चित्रपटाचे दिग्दर्शक वरुण सुखराज, निर्माते डॉ. विनय काटे आणि स्नेहा देसाई हे मान्यवर हजर होते.

'शाहू छत्रपती' या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता डॉ.जितेंद्र आव्हाड आहेत. तर या चित्रपटाची कथा ज्येष्ठ लेखक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या अनेक दशकांच्या संशोधन कार्यावर आधारित आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा वरुण सुखराज सांभाळणार आहे. विद्रोही फिल्म्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. हा चित्रपट सहा भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

फुल पैसा वसूल! रोहित शेट्टी आणतोय 'Golmaal 5', गोव्यात होणार शूटिंगची सुरुवात; अजय देवगणनं दिलीये हिंट

Delhi Airport Technical Glitch: 800 फ्लाईट्सना विलंब, अनेक रद्द; दिल्ली विमानतळावर तांत्रिक अडचणीचा हजारो प्रवाशांना फटका

"तुझी मासिक पाळी संपली की सांग...": महिला क्रिकेटपटूचा सिलेक्टरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, क्रीडा विश्वात खळबळ

समुद्रकिनारी रंगला भव्य विवाह! तेजश्री प्रधानने गोव्याच्या किनाऱ्यावर केलं 'Destination Wedding' शूट

Goa Today's News Live: काणकोण बसस्थानकाजवळील रस्त्याची दुर्दशा, चालक हैराण

SCROLL FOR NEXT