Shahrukh Khan Dainik Gomantak
मनोरंजन

Shahrukh Khan: 'जोपर्यंत तुमचा बाप जिंवत आहे तोपर्यंत...' किंग खानचे मुलांना संबोधून वक्तव्य

Shahrukh Khan: आता हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

दैनिक गोमन्तक

Shahrukh Khan's message to family

किंग खान विविध कारणांमुळे सतत चर्चेत असतो. चित्रपट, वैयक्तिक आयुष्य, सोशल मिडियावर शेअर केलेल्या पोस्ट किंवा एखाद्या ठिकाणी केलेले वक्तव्य अशा कोणत्याही कारणामुळे शाहरुख सतत चर्चेत असतो. एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच, शाहरुख एक उत्कृष्ट पिता आणि पतीदेखील आहे. तो नेहमीच आपल्या कुटुंबाप्रति प्रेम व्यक्त करताना दिसतो. आता त्याचा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

एका पुरस्कार सोहळ्यातील हा व्हिडिओ आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुखला पुरस्कार मिळाल्यानंतर भाषण करताना दिसत आहे. शाहरुखने आपला पुरस्कार पत्नी गौरी आणि त्याची मुले आर्यन, सुहाना आणि अबराम यांना समर्पित केला. त्याने आपल्या मुलांना एक मेसेज दिला, ज्यात शाहरुख म्हणाला, हा मेसेज माझ्या मुलांना आणि माझ्या पत्नीसाठी आहे 'जोपर्यंत तुमचे वडील जिवंत आहेत, मनोरंजन जिवंत आहे.' असे तो व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहे. त्याच्या या भाषणानंतर टाळ्यांचा कडकडाट होताना दिसत आहे.

दरम्यान, २०२३ हे संपूर्ण वर्ष किंग खानच्या चित्रपटांनी गाजवले. 'पठाण' , 'जवान' या चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घातला होता. 'डंकी' हा चित्रपट वर्षाच्या शेवटी आला होता, हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर पठाण आणि जवानच्या तुलनेत फारशी कमाल दाखवू शकला नाही. मात्र संपूर्ण वर्ष शाहरुखच्या नावाची मोठी चर्चा होताना पाहायला मिळाली. आता हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. चाहते शाहरुखचे कौतुक करताना दिसत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 17 August 2025: करिअरमध्ये प्रगती, प्रवासाचे योग ; मात्र आरोग्याकडे लक्ष द्या

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

Sanju Samson: आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनची दमदार बॅटिंग, फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT