Viral Video Dainik Gomantak
मनोरंजन

शाहरुखच्या 'जवान'ची मुंबई पोलिसाला भुरळ, चलेया गाण्यावरचा डान्स व्हिडीओ व्हायरल

शाहरुख खानच्या जवानच्या चलेया या गाण्यावर नाचतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

Rahul sadolikar

Police Constable Viral Dance Video : शाहरुखच्या जवानने त्याच्या चाहत्यांना अक्षरश: वेड लावले आहे. 7 सप्टेंबरला रिलीज झालेल्या जवानच्या कमाईचे आकडे पाहिले की हे लक्षात येवू शकतं की शाहरुखच्या चित्रपटाने चाहत्यांच्या पसंतीला उतरण्यात यश मिळवले आहे.

जवानची गाणीही चाहत्यांनी डोक्यावर घेतली आहेत. या गाण्यावर रील्सही सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.

आता शाहरुखच्या चलेया या गाण्यावर एका मुंबई पोलिसाचा हा व्हायरल व्हिडीओ पाहा.

मुंबई पोलिसाचा व्हायरल व्हिडीओ

मुंबई पोलिस अमोल कांबळे यांचा डान्स व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर यूजर्सनी या डान्स स्टेपचा आनंद घेत कमेंटसचा पाऊस पाडला आहे. 

अमोल कांबळे यांचे अनेक व्हिडीओ यापूर्वीही सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. आपल्या अफलातून डान्स स्टेपमुळे अमोल कांबळ यांचे व्हिडिओ पूर्वी टिकटॉकवर आणि इंस्टाग्रामवर प्रचंड व्हायरल झाले होते. 

चलेयाचीच चर्चा

शाहरुख खानच्या चलेया गाण्याचे सोशल मिडीयाला वेड लागलेले असताना आता या व्हायरल व्हिडीओने शाहरुखच्या चाहत्यांना आणखी खुश केले आहे.

  मुंबई पोलिसात असणारे 40 वर्षीय अमोल कांबळे, त्याच्या या व्हायरल व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत. व्हायरल डान्सच्या या पोस्टला 657K लाइक्स आणि 10.1K कमेंटस आल्या आहेत.

यापूर्वीही व्हिडीओ व्हायरल

अमोल कांबळे यांचा यापूर्वी अभिनेता रणवीर सिंगसोबतचं रील व्हायरल झालं होतं. अमोल कांबळे सांगतात , “मला माहिती नव्हते की तो (  चलेया व्हायरल व्हिडीओ) इतक्या मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचला आहे. 

मी फक्त माझ्या डान्सचा सराव करतो आणि सोशल मीडियावर टाकतो. मी वेगवेगळ्या नृत्यदिग्दर्शकांना पाहून शिकतो आणि जर मला एखादे गाणे आवडत असेल तर मी ते वारंवार ऐकतो आणि नंतर त्या डान्सच्या स्टेप्स कल्पना करू लागतो.”

अमोल कांबळे सांगतात

आपल्या डान्सच्या छंदाबद्दल बोलताना अमोल कांबळे सांगतात “मला नृत्याची आवड आहे आणि ते खूप दिवसांपासून करत आहे. पण मी पोलीस झाल्यावर मी डान्स करणं थांबवलं. 

पुढे अमोल कांबळे म्हणाले सोशल मीडियाने माझी आवड वाढवली आणि मी माझे व्हिडिओ पूर्वी टिकटॉक आणि आता इंस्टाग्रामवर टाकण्यास सुरुवात केली. 

मला मिळालेले प्रतिसाद मला आवडतात आणि जेव्हा माझे व्हिडिओ इतरांना आनंद देतात तेव्हा मला समाधान वाटते.”

Viral Video: दिल्ली हायकोर्टात ऑनलाईन सुनावणी दरम्यान वकिलानं घेतला महिलेचा कीस; नंतर काय घडलं? जाणून घ्या

15 मिनिटांच्या आत पाकिस्तानी सैन्याने केले 'सरेंडर', तालिबानने शस्त्रेही घेतली हिसकावून; रणगाडे आणि शस्त्रे जप्त केल्याचा दावा VIDEO

Ravi Naik: गोंयचो पात्रांव अनंतांन विलीन! रवी नाईक यांना 21 बंदुकींच्या सलामीसह अखेरचा निरोप

Bicholim: मोठी दुर्घटना टळली! डिचोलीत सिलिंडर गळतीमुळे शेगडी पेटली, फ्लॅटमालक आणि अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणेंच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले, लोक ओक्साबोक्शी रडले; रवींच्या अंत्यदर्शनाला लोटला जनसागर

SCROLL FOR NEXT