Jawan Twitter Review Dainik Gomantak
मनोरंजन

Jawan Twitter Review: कुणी म्हणतंय ब्लॉकबस्टर, कुणाला वाटतोय मास्टरपीस...'जवान'ने चाहत्यांना लावलं वेड

Jawan Twitter Review: शाहरुख खानचा बहुचर्चित जवान आज (7 सप्टेंबर) रिलीज झाला आणि पहाटेपासुन चाहत्यांच्या प्रचंड गर्दीने थिएटर्स हाऊसफुल्ल झाली आहेत.

Rahul sadolikar

Jawan Twitter Review: शाहरुख खानचा जवान 7 सप्टेंबरला थिएटर्समध्ये रिलीज होताच चाहत्यांनी एकच जल्लोष केला आहे. पठाननंतर शाहरुखच्या जवानची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते.

चाहत्यांची ही प्रतिक्षा पूर्ण झाली असुन चित्रपट पाहिल्यानंतर चाहत्यांनी सोशल मिडीयावर चित्रपटाचं कौतुक करत हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरणार असल्याचं सांगितलं आहे.

'जवान'चा अनेक शहरांंमध्ये पहाटे 5 चा शो

शाहरुख खान हाच बॉलीवूडचा बादशाह आहे हे त्याने सिद्धच केले आहे. पठाननंतर जवानला पहिल्या दिवशी मिळालेला प्रतिसाद बघता हेच म्हणावं लागेल.

बॉलीवूडच्या किंग खानने त्याच्या 'जवान' चित्रपटाने पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 

हा चित्रपट आज 7 सप्टेंबर रोजी जगभरात प्रदर्शित झाला असुन त्यासोबतच चाहत्यांनी स्वत:हून सोशल मिडीयावर केलेलं चित्रपटाचं प्रमोशन पाहता हा चित्रपट चांगलाच धुमाकूळ घातलाय.  'जवान' चित्रपटाचा पहिला शो देशातील अनेक शहरांमध्ये पहाटे 5 वाजता ठेवण्यात आला आहे. 

जवानचं अॅडव्हान्स बुकींग

जवानने 51 कोटी रुपयांची एवढी धमाकेदार आगाऊ बुकिंग केली होती. साहजिकच पहिल्या दिवसाच्या धमाकेदार कलेक्शनसाठी याचा चांगलाच फायदा होणार आहे.

पहिल्याच दिवशी ओपनिंगमध्ये अनेक बड्या चित्रपटांना एका झटक्यात मागे टाकण्याची ताकद जवानने दाखवली आहे. 

शाहरुख खानच्या जवानचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे लोक थिएटरमध्ये मोठ्या संख्येने गर्दी करत आहेतच ;पण ट्विटर आणि सोशल मीडियावर 'जवान' पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. शाहरुख खानच्या चाहत्यांनी सोशल मिडीयावर दिलेल्या या रिव्ह्यूजवर एक नजर टाकूया.

ट्विट्टरवर जवानची क्रेझ

7 सप्टेंबरच्या रिलीज दिवशा सकाळपासुन ट्विटरवर 'जवान'बाबत लोकांच्या प्रतिक्रियांचा ओघ सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासुन सुरु असलेली जवानची क्रेझ रिलीजनंतर दुप्पट झाली आहे.

सोशल मिडीयावर #JawanTsunamiTomorrow, #JawanFirstDayFirstShow, #JawanAdvanceBookings, #ShahRuhKhan, #Atlee यासारखे हॅशटॅग्स फिरत आहेत.

 पण आता हा चित्रपट प्रदर्शित झाल्याने त्याच्या रिव्ह्यूची बरीच चर्चा होत आहे. शाहरुखचे चाहते जवानची झलक शेअर करत. ट्विट्टरवर जवानचे रिव्ह्यू ट्रेंड होत आहेत.

यूजर्सच्या प्रतिक्रिया

एका यूजरने लिहिले - लोक शाहरुख खानसाठी वेडे आहेत, नाहीतर एवढ्या पहाटे कोण चित्रपट पाहायला जातो.

ट्विटरवर अपडेट करताना आणखी एका यूजरने म्हटले आहे - "ही फिल्म आग आहे, अॅटलीची ही फिल्म त्याचे सगळे जुने रेकॉर्ड तोडेल". शाहरुखच्या या चित्रपटात साऊथचे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आहेत.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT