Jailer Vs Jawan Dainik Gomantak
मनोरंजन

Jailer Vs Jawan : आता 'थलैवा'ची टक्कर 'किंग खान'शी...'जेलर' आणि 'जवान'चा मुकाबला रंगणार बॉक्स ऑफिसवर

शाहरुख खानचा जवान रिलीज व्हायला फक्त 4 दिवस उरले असताना आता रजनीकांत यांच्या जेलरला आता बॉक्स ऑफिसवर एक तगडं आव्हान मिळू शकतं. जेलरची सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलीच क्रेज आहे.

Rahul sadolikar

अभिनेते रजनीकांत यांचा जेलर बॉक्स ऑफिसवर सध्या जोमाने चालतोय. चित्रपटाने आतापर्यंत 35 कोटींच्या कमाईची मजल मारली आहे.

सनी देओलच्या गदरशी एका बाजूला स्पर्धा सुरू असताना आता रजनीकांत यांच्या जेलरला शाहरुख खानच्या जवानशी जोराचा संघर्ष करावा लागेल.

जवान 7 सप्टेंबरला रिलीज होणार आहे तर नुकतीच जेलरलाही ओटीटी रिलीज डेट मिळाली आहे.

जेलर आणि जवानची टक्कर

देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बॉक्स ऑफिसवर उत्कृष्ट कामगिरी करणारा जेलर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल. 

शनिवारी प्राइम व्हिडिओने एका निवेदनात जाहीर केले की, नेल्सन दिलीपकुमारचा क्राइम ड्रामा चित्रपट, रजनीकांतचा जेलर , 7 सप्टेंबरपासून प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.

विशेष म्हणजे, शाहरुख खान मुख्य भूमिकेत असलेला जवान, त्याच दिवशी थिएटरमध्ये दाखल होईल, म्हणजे ओटीटीवरुन जेलरची थिएटरमध्ये रिलीज होणाऱ्या जवानशी टक्कर होईल.

जेलर

सन पिक्चर्सच्या बॅनरखाली कलानिथी मारन निर्मित या चित्रपटाचे लेखनही नेल्सन यांनी केले आहे. जेलरमध्ये रम्या कृष्णन, योगी बाबू, विनायकन, तमन्ना भाटिया आणि मास्टर ऋत्विक या प्रमुख भूमिकेत सामील कलाकार आहेत . 

या चित्रपटात मोहनलाल, शिवा राजकुमार आणि जॅकी श्रॉफ यांचे खास कॅमिओ देखील आहेत. जेलरचा बॉक्स ऑफिसवर तर बोलबाला झालाच पण चाहत्यांनी सोशल मिडीयावरही चित्रपटाची पब्लिसिटी केली.

जेलरची गोष्ट

चाहते जेलरला प्राइम व्हिडिओवर तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदीमध्ये पाहू शकतात. हा चित्रपट निवृत्त जेलर टायगर मुथुवेल पांडियन (रजनीकांत यांनी साकारलेला) बद्दल आहे, जो आपल्या मुलाच्या मारेकऱ्यांचा शोध घेतो. 

दिग्दर्शक नेल्सन कुमार म्हणाले

दिग्दर्शक नेल्सन कुमार म्हणाले जेलर माझ्यासाठी अत्यंत खास आहे; माझ्याकडे रजनीकांत सर होते त्यांच्या अभिनय शैलीने कथेला उंचावण्यासाठी आणि भारतीय चित्रपट उद्योगातील सुपरस्टार - मोहनलाल सर, शिवा राजकुमार सर, आणि जॅकी श्रॉफ सर - या मास एंटरटेनरला त्यांचा जादुई स्पर्श जोडण्यासाठी सोबत होतेच. 

जगभरातील प्रेक्षकांना आता या अॅक्शन ड्रामाचा, कधीही आणि कुठेही, त्यांच्या घरून आनंद देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत,"

जेलरची कमाई

जेलरने भारतात बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवले आहे. Sacnilk.com नुसार , थिएटरमध्ये पहिल्या आठवड्यात, जेलरने ₹ 235.85 कोटी कमावले, दुसऱ्या आठवड्यात त्याने ₹ 62.95 कोटी कमावले आणि तिसऱ्या आठवड्यात चित्रपटाने ₹ 29.43 कोटी कमावले. 

शुक्रवारी, 23 व्या दिवशी, चित्रपटाने सुरुवातीच्या अंदाजानुसार ₹ 1.60 कोटी कमावले. गेल्या महिन्यात थिएटरमध्ये रिलीज झाल्यापासून, जेलरने भारतात ₹ 329.83 कोटी जमा केले आहेत.

Hadkolan Goa: रेड्यांच्या जत्रेसाठी सुप्रसिद्ध असलेले, निसर्ग सौंदर्याने सजलेलले गाव 'अडकोळण'

Iran America Tension: "ट्रम्प इराणचे गुन्हेगार...!", खामेनेई यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षावर ठेवला विध्वंसाचा ठपका; जागतिक राजकारणात पुन्हा खळबळ

Goa Crime: आधी प्रेम, मग अनन्वित अत्याचार अन् शेवटी गळा चिरला, रशियन सिरीयल किलरच्या क्रूरतेनं हादरला गोवा; लवकरच उलघडणार 10 तरुणींच्या मृत्यूचं गूढ?

Congress MLA: "सुंदर मुलगी दिसली की मन भटकतं अन् अत्याचर होतो..." काँग्रेस आमदारानं तोडले अकलेचे तारे; घृणास्पद वक्तव्यावर भाजप आक्रमक VIDEO

अँड्रॉइड स्मार्टफोन युझर्ससाठी धोक्याची घंटा! डॉल्बी ऑडिओमधील तांत्रिक बिघाडानं उडाली खळबळ; केंद्र सरकारकडून नवीन चेतावणी जारी

SCROLL FOR NEXT