Dunki updates Dainik Gomantak
मनोरंजन

Dunki updates : 'जवान'नंतर दिवाळीत फुटणार डंकीचा फटाका...शाहरुखच्या चाहत्यांसाठी मोठी अपडेट

Shahrukh khan's Upcoming Dunki updates : रिपोर्ट्सनुसार, 'डंकी'चे निर्माते लवकरच त्याचा टीझर घेऊन येत आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर शाहरुख खान मोठा धमाका करणार असल्याची शक्यता आहे.

Rahul sadolikar

शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी 'जवान' चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 7 सप्टेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पदुकोण, नयनतारा आणि विजय सेतुपती दिसणार आहेत. 

दुसरीकडे, प्रेक्षक शाहरुखच्या आगामी 'डंकी' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या चित्रपटाबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे ;आणि ही अपडेट ऐकून चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

टिजर लवकरच रिलीज

मिळालेल्या माहितीनुसार शाहरुखच्या डंकीचा टिझर लवकरच रिलीज होणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर शाहरुख खान मोठा धमाका करणार असल्याचे मानले जात आहे. सर्वांना दिवाळीचे गिफ्ट देत, निर्माते लवकरच 'डंकी'चा टीझर रिलीज करण्याचा विचार करत आहेत. 

दिवाळीचा सण जसजसा जवळ येत आहे तसतसा रसिकांचा उत्साह वाढत आहे. राजकुमार हिरानी यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेला हा चित्रपट त्यांचा चित्रपटाच्या वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आहे ;पण, अद्याप निर्माते किंवा किंग खानकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. 

चित्रपटाची कथा

डंकी चित्रपटात शाहरुख खानने अशा लोकांची कहाणी सांगितली आहे जे परदेशात जाऊन अडकतात आणि नंतर मायदेशी परत येऊ इच्छितात. या चित्रपटात तापसी पन्नू देखील आहे. ती शाहरुखची नायिका म्हणून पहिल्यांदाच चित्रपटात दिसणार आहे. 

'डंकी' डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे. शाहरुख खानचा पठाण हा यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे आणि सप्टेंबरमध्ये येणारा जवान बॉक्स ऑफिसवर विक्रम मोडेल असा विश्वास आहे. 

डंकी डिसेंबरमध्ये रिलीज होणार...

डंकी शाहरुख खानकडून चाहत्यांसाठी दिवाळीची मोठी भेट ठरू शकतो. चित्रपटात अशा लोकांची गोष्ट सांगितली आहे जे चुकीच्या मार्गाने परदेशात जातात आणि अडकतात आणि नंतर मायदेशी परत येऊ इच्छितात. या चित्रपटात तापसी पन्नू देखील आहे. ती शाहरुखची नायिका म्हणून पहिल्यांदाच चित्रपटात दिसणार आहे. डंकी डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे. 

Konkani Schools: ‘देवनागरी कोकणी’च्या शाळा सुरू करण्यास हरकत नाही! आमदारांनी पुढाकार घ्‍यावा, CM सावंत यांचे आवाहन

Goa Assembly Session: टॅक्सी व्यवसाय नींज गोयंकर यांच्या हातात राहिला पाहिजे

Goa Panchayat: पंचायत कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग, गुदिन्होंनी दिली माहिती; रेकॉर्ड पेपरलेस करण्याचा होणार प्रयत्न

विमान धावपट्टीवर पोहोचताच तांत्रिक बिघाड, प्रवाशांना उतरवून केली पुन्हा तपासणी; 'फ्लाय-91'मध्ये गोवा-पुणे प्रवाशांची गैरसोय

International Tiger Day: 2022 मध्ये गोव्यात 6 वाघ दिसले, पुढे काय..?

SCROLL FOR NEXT