Bollywood actor Shahrukh Khan Dainik Gomantak
मनोरंजन

Shahrukh Khan: 'तो' व्हिडिओ पाहून चाहते किंग खानच्या पुन्हा प्रेमात Video Viral

Shahrukh Khan: आता शाहरुख आणि त्याच्या चाहत्याचा असा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामुळे चाहते किंग खानवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

दैनिक गोमन्तक

Shahrukh Khan: बॉलीवूडचा बादशहा, किंग खान अशी ज्याची ओळख आहे तो अभिनेता म्हणजे शाहरुख खान हा आहे. शाहरुखचे जगभरात लाखो-करोडो चाहते आहेत. काहीजण त्याने निभावलेल्या भूमिकांचे, काहीजण त्याच्या चित्रपटाचे तर काहीजण त्याच्या लूकचे चाहते आहेत. असे असले तरी शाहरुख माणूस म्हणूनही अनेकांना आवडतो. आता शाहरुख आणि त्याच्या चाहत्याचा असा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामुळे चाहते किंग खानवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की, एक चाहता शाहरुख खानला पाहिल्यानंतर भावूक झाला आहे. त्याचे शरीर थरथरत असून तो रडत आहे, ते पाहिल्यानंतर शाहरुख त्याची गळाभेट घेतो आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर ते फोटोही काढताना दिसत आहे. हे दृश्य डंकी फॅनमीट दरम्यानचे असल्याचे म्हटले जात आहे.

आता हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून चाहते किंग खानचे कौतुक करताना दिसत आहेत. ज्याप्रकारे शाहरुखने चाहत्याला प्रेमाने गळाभेट घेत आहे, त्याची विचारपूस करत आहे या वागण्याने शाहरुखने पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.

दरम्यान, शाहरुखच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर शाहरुख नुकताच डंकी या चित्रपटात दिसला होता. आता तो कोणत्या चित्रपटात दिसेल याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही मात्र सलमान खान सोबत टायगर वर्सेस पठाण या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरु करेल असेल म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT