Shahrukh Khan
Shahrukh Khan Dainik Gomantak
मनोरंजन

Shah Rukh Khan: मन्नतवर ग्रँड सेलिब्रेशन! किंगखानने पटकावला फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला आहे. या आनंदात 'मन्नत' वर ग्रँड सेलिब्रेशन करण्यात आले. या पार्टीत अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती.

किंग खान 'पठाण' चित्रपटातून कमबॅक करतो आहे. त्याचे अनेक सिनेमे सध्या पाईपलाईनमध्ये आहेत. दरम्यान शाहरुखला फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुखने मन्नतवर एका पार्टीचं आयोजन केले होते. या पार्टीत अनेक देशांचे राजदूत उपस्थित होते.

जंगी पार्टीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पार्टीत शाहरुख पाहुणचार करताना दिसत आहे. भारतासह संपूर्ण जगात सांस्कृतिक दृष्ट्या शाहरुखचे योगदान खूप मोठे आहे. त्याच्या याच योगदानामुळे त्याला फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला आहे.

शाहरुखला 3 मे रोजी 'ताजमहाल पॅलेस'वर या पुरस्काराने गौरविण्यात आलं. किंग खानचा 'देवदास' चित्रपट फ्रान्समधील सिनेप्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. फ्रान्सच्या नागरिकांना शाहरुख आणि त्याचे चित्रपट आवडतात. त्यामुळेच किंग खानला फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'द लीजन ऑफ ऑनर' (the Légion d’Honneur) मिळाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Russian In Goa: मद्यधुंद रशियन जोडप्याचा शिवोलीत राडा; पोलिसांसोबत हुज्जत, 108 ची मदत नाकारली

Loksabha Election 2024 : पंतप्रधान मोदींच्या यशासाठी मतदारांचे आशीर्वाद महत्त्‍वाचे : मुख्यमंत्री सावंत

Goa Loksabha Voting: 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांच्या घरबसल्या मतदानाला गोव्यात सुरुवात

Amit Shah Fake Video Case: अमित शाह यांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना समन्स, दिल्ली पोलिस करणार चौकशी

Goa Today's Live News Update: मांद्रे आश्वे येथील दल्लास हॉटेल सील

SCROLL FOR NEXT