Pathaan Teaser Dainik Gomantak
मनोरंजन

Pathaan Tickets Price: किंग खानचं याडं लय डेंजर, 'पठाण' साठी चाहते मोजतायेत हजारो रुपये!

दैनिक गोमन्तक

Pathaan Tickets Price: शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या 'पठाण' चित्रपटाची जादू चाहत्यांना रिलीज होण्याआधीच वेड लावत आहे. किंग खान 4 वर्षानंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. अशा परिस्थितीत, त्याचे चाहते 'पठाण'ची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दरम्यान, चाहते शाहरुखसाठी इतके वेडे आहेत की, त्याला पाहण्यासाठी ते कोणत्याही किंमतीत चित्रपटाचं तिकिट खरेदी करण्यास तयार आहेत. पठाणचे अॅडव्हान्स बुकिंग 20 जानेवारीपासून सुरु झाले आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाचे तिकीट दर कितीही असोत, चाहते पूर्ण बुकिंग करत आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'पठाण' चित्रपटाचे तिकीट गुरगावमधील अॅम्बियन्स मॉलमध्ये 2,200, 2200 आणि 2400 रुपयांना विकले जात आहे.

पठाणचं वेड

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुरुग्राममध्ये 'पठाण'ची तिकिटे इतकी महाग झाल्यानंतर अॅम्बियन्स मॉलमधील चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल्ल आहेत. यावरुन या चित्रपटाबद्दल लोकांना किती उत्सुकता आहे, याचा अंदाज येतो. असेच राहिल्यास पुन्हा एकदा शाहरुख खान बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई करु शकतो.

दिल्लीतही पठाणच्या तिकीटासाठी झुंबड

केवळ गुरुग्रामच नाही तर दिल्लीतही 'पठाण'चे तिकीट 2100 रुपयांना विकले जात आहे. इतकेच नाही तर काही चित्रपटगृहांनी मॉर्निंग शोचे प्रत्येक तिकीट 1000 रुपयांना विकले आहे. मात्र, महागड्या तिकिटांनंतरही चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगने विक्रम मोडला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख आणि दीपिकाच्या चित्रपटाच्या तेलुगू आणि हिंदी व्हर्जनची सर्वाधिक तिकिटे विकली गेली आहेत. पठाणने केवळ अॅडव्हान्स बुकिंगद्वारे 14.66 कोटींची कमाई केल्याचे सांगितले जात आहे.

आता या चित्रपटाच्या नशिबात काय लिहिले आहे, हे दोन दिवसांनी कळेल, कारण हा चित्रपट 25 जानेवारीला जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणशिवाय (Deepika Padukone) या चित्रपटात जॉन अब्राहम आणि डिंपल कपाडिया यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT