Bloody Daddy Trailer Dainik Gomantak
मनोरंजन

Bloody Daddy Trailer: कोकेनने भरलेल्या बॅगची गोष्ट...ब्लडी डॅडीचा ट्रेलर एकदा पाहाच

अभिनेता शाहिद कपूरचा आगामी ब्लडी डॅडी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.

Rahul sadolikar

शाहिद कपूरचा आगामी चित्रपट 'ब्लडी डॅडी'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटात संजय कपूर, डायना पेंटी आणि रोनित रॉय आणि राजीव खंडेलवाल यांच्याही भूमिका आहेत. शाहिदचा हा चित्रपट चित्रपटगृहात नाही तर ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. तुम्ही तो 9 जून 2023 रोजी Jio सिनेमावर पाहू शकता, तोही विनामूल्य.

शाहिद कपूरने सोशल मीडियावर ब्लडी डॅडीचा ट्रेलर शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, 'ए हेल ऑफ ए ब्लडी नाईट... ट्रेलर आऊट. #BloodyDaddyOnJioCinema'

चित्रपटाचा ढासू ट्रेलर...

चित्रपटाचा ट्रेलर अॅक्शन सीन्सने भरलेला आहे. शाहिद कपूर एका भयानक भूमिकेत दिसत आहे. व्हिडिओची सुरुवात बॅकग्राऊंडला शाहिदच्या आवाजाने होते, ज्याने रात्रीची गोष्ट सांगितली जेव्हा गोष्टींनी चुकीचे वळण घेतले.

शाहिद आणखी एक आगामी चित्रपट

याआधी शाहीदच्या आणखी एका आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आहे, त्याचीही खूप चर्चा झाली. पहिल्या लूक पोस्टरमध्ये, कृती आणि शाहिद दोघेही सनसेटच्या बॅकग्राउंडवर समोरासमोर बाईकवर बसले होते. क्रिती सीटवर दिसली तर शाहिद पेट्रोलच्या टाकीवर बसला. पोस्टरवर 'एक अशक्य प्रेमकथा' असे शब्दही लिहिले होते. पोस्टरवर प्रतिक्रिया देताना एका व्यक्तीने Reddit वर लिहिले की, “शाहिदला उंच दिसण्यासाठी पेट्रोल टाकीजवळ बसवत नाही.”

"हे थोडं विचित्र दिसत नाही का की पुरुष लीड अॅक्टर टाकीवर आणि महिला सीटवर बसलेली आहे? क्रितीची बॉडी स्ट्रक्चर खरं तर शाहिदपेक्षा मोठी दिसत आहे," अशीही प्रतिक्रिया एका . एका युजरने लिहिले, "शाहिद इतर ठिकाणी बसण्यापेक्षा क्रितीच्या मांडीवर का बसला आहे?

Shahid Kapoor

शाहिदचे आगामी प्रोजेक्ट

शाहिद कपूर शेवटचा राज आणि डीकेच्या क्राईम थ्रिलर वेब सीरिज 'फर्जी' मध्ये दिसला होता. याआधी तो 'जर्सी' या स्पोर्ट्स ड्रामामध्ये दिसला होता. यात त्याने क्रिकेटरची भूमिका साकारली होती. तो क्रिती सॅननसोबत एका रोमँटिक चित्रपटात दिसणार आहे, ज्याचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही.

याआधी फर्जीमधल्या कामामुळे झालं होतं शाहिदचं कौतुक

फर्जी या चित्रपटात बनावट नोटांच्या स्कँडल आणि त्याचा तपास करणारा पोलिस अधिकारी यांची गोष्ट आहे. या चित्रपटात शाहिद सोबत विजय सेतुपती मुख्य भूमीकेत दिसला होता. या चित्रपटात शाहिदच्या भूमीकेचं कौतुक झालं होतं. आता या भूमीकेत शाहीदचं खूप कौतुक झालं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT