Shah Rukh Khan Dainik Gomantak
मनोरंजन

SRK Unseen Dance Video: किंग खानचा पंजाबी गाण्यावर डान्स, चाहत्यांना केले चकित

Shah Rukh Khan: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे.

दैनिक गोमन्तक

SRK Unseen Dance Video: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. 'रॉकेटरी'च्या कॅमिओशिवाय शाहरुख खान बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यावर दिसला नाही. अशा परिस्थितीत चाहते शाहरुखच्या कमबॅकची आतुरतेने वाट पाहत आहेत. शाहरुखने काही दिवसांपूर्वी पठाण, जवान आणि डंकी चित्रपटांची घोषणा करुन चाहत्यांची उत्सुकता वाढवली होती. दरम्यान, शाहरुखचा एक न पाहिलेला डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे.

शाहरुख खानचा डान्स व्हिडिओ

शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) वेगाने शेअर होत आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख 'ना जा' या पंजाबी गाण्यावर काही लोकांसोबत डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ काहीशा अंधारात शूट करण्यात आला असल्याने काहीही स्पष्ट दिसत नाही. परंतु ज्या अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, त्यानुसार हा थ्रोबॅक व्हिडिओ आहे. जी झिरो चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आहे. सोशल मीडिया यूजर्संना हा व्हिडिओ खूप आवडतोय.

शाहरुख खानचे आगामी प्रोजेक्ट्स

शाहरुख खान 'पठाण' या चित्रपटातून पुनरागमन करत आहे. पठाण जानेवारी 2023 मध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय शाहरुखने राजकुमार हिरानीसोबत (Rajkumar Hirani) 'डंकी' या चित्रपटाचीही अधिकृत घोषणा केली आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत तापसी पन्नूची जोडी आहे. हा चित्रपट 22 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या दोन चित्रपटांशिवाय (Movies) शाहरुख दिग्दर्शक एटलीसोबत 'जवान' या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. शाहरुख खानचा 'जवान' 2 जून 2023 रोजी हिंदी तसेच तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नडमध्ये रिलीज होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'आज त्रास, उद्या विकास', पायाभूत सुविधांच्या कामांमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल राज्यपालांकडून खेद व्यक्त; दीर्घकालीन फायद्याची दिली ग्वाही

Donald Trump: "मीच नाटोचा तारणहार!" डोनाल्ड ट्रम्प यांचा जागतिक राजकारणात नवा धमाका; ग्रीनलँडवर फडकणार अमेरिकेचा झेंडा?

IND VS NZ: विजयानंतरही 'BCCI'चा मोठा निर्णय; भारतीय ताफ्यात नवा भिडू सामील, वॉशिंग्टन सुंदर बाहेर

Goa Winter Session 2026: 'कुशावती' जिल्हा निर्मिती, खाणकाम अन् विकासाचा नवा रोडमॅप; राज्यपालांच्या भाषणातील 9 महत्त्वाचे मुद्दे

Goa Assembly Session: गोमंतकीयांसाठी तक्रारींचे निवारण आता एका 'क्लिक'वर

SCROLL FOR NEXT