Shah Rukh Khan  Dainik Gomantak
मनोरंजन

Shah Rukh Khan: ...अन् किंग खानला फिमेल फॅन म्हणाली "आय लव यू अक्षय"

अभिनेता शाहरुख खानला एक फिमेल फॅन विमानतळावर भेटली, फ्लाईट सुटत असतानाही शाहरुखकडे तिने ऑटोग्राफचा आग्रह धरला

Rahul sadolikar

काही दिवसांपुर्वी शाहरुखच्या खानच्या पठानचीच सर्वत्र चर्चा होती. पण पठान रिलीज झाला आणि शाहरुखने सिद्ध केले की तोच बॉलिवूडचा बादशाह आहे. पठाण सध्या बॉक्स ऑफिसवर कमाल करत आहे. प्रदीर्घ काळानंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणाऱ्या शाहरुख खानने या चित्रपटाद्वारे आपणच बॉक्स ऑफिसचा खरा बादशाह असल्याचे सिद्ध केले आहे. 

अलीकडेच पठाणने बॉक्स ऑफिसवर 450 कोटींचा टप्पा पार केला आहे. आज गुरुवारमध्ये आम्ही तुम्हाला शाहरुख खानशी संबंधित एक मजेदार किस्सा सांगणार आहोत. 

खरंतर ही गोष्ट शाहरुखनेच एका चॅट शोदरम्यान सांगितली होती. एका महिला चाहत्यासाठी तो अक्षय कुमार कसा बनला हे त्याने सांगितले. एका चॅट शोमध्ये हा मजेदार किस्सा शेअर करताना शाहरुखने सांगताना त्याने स्वत: हा किस्सा एंंजॉय केला.

एकदा एका प्रवासादरम्यान शाहरुख विमानतळावर असताना एक महिला चाहती त्याच्याकडे आली आणि फोटो आणि ऑटोग्राफसाठी आग्रह धरला. शाहरुखने त्या महिलेला समजावून सांगितले की, खूप उशीर झाला आहे आणि त्याची फ्लाइट चुकणार आहे. 

तरीही ती महिला राजी झाली नाही आणि त्याला विनंती करत राहिली. त्यानंतर शाहरुखने घाईघाईने चेक इन केले आणि नंतर तिला ऑटोग्राफ देण्यासाठी पुन्हा महिला चाहत्याकडे परतला. 

यादरम्यान महिलेने अभिनेत्याला असे काही सांगितले जे ऐकून शाहरुखलाही धक्का बसला. ती महिला म्हणाली, "मी तुझी खूप मोठी फॅन आहे... माझे तुझ्यावर प्रेम आहे अक्षय." पण शाहरुखने न चिडता, रागावता त्या महिला फॅनचा गैरसमज दूर केला नाही. एक कलाकार म्हणुन कधीही कुणाशी अहंकाराने न वागल्यानेच आज शाहरुख खानला सुपरस्टार मानले जाते. 

शाहरुखचे हे वक्तव्य ऐकून चॅट शोमध्ये उपस्थित सर्व लोक जोरजोरात हसायला लागले. पुन्हा त्याला विचारले की त्याने पुढे काय केले. शाहरुखने शोमध्ये सांगितले की, त्याला महिलेचे हृदय तोडायचे नव्हते, म्हणून त्याने तिला अक्षय कुमारच्या नावाने ऑटोग्राफ दिला.

  पठाण ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर शाहरुख लवकरच जवानमध्ये दिसणार आहे. साऊथचा सुपरस्टार दिग्दर्शक ऍटली या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

TVS Jupiter: खास तुमच्यासाठी! दमदार इंजिन, स्टायलिश लूक आणि आधुनिक फीचर्ससह 'टीव्हीएस जुपिटर'चे नवे मॉडेल लॉन्च

मराठाच नव्हे, मुघलांनीही वापरलेला मार्ग होणार बंद; गोवा-कर्नाटकला जोडणारा केळघाट इतिहासजमा!

Viral Video: सायकलस्वाराचा जीवघेणा स्टंट! सोशल मीडियावर खरतनाक व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'याला लवकर मरायचंय का?'

IND vs PAK: भारत 'पाकिस्तान'सोबत क्रिकेट सामना का खेळतंय? BCCI नं स्पष्ट केली भूमिका

India vs Pakistan: भारत–पाक सामन्यावरून देशात गोंधळाचं वातावरण, कुठं आंदोलन तर कुठं टीम इंडियाच्या विजयासाठी पूजा-अर्चना Watch Video

SCROLL FOR NEXT