Shah Rukh Khan Dainik Gomantak
मनोरंजन

Shah Rukh Khan: 'पठाण' रिलीज होण्यापुर्वीच किंग खानने चाहत्यांना दिलं सरप्राइज; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

शाहरुख खान हा सोशल मीडियाच्या माध्यमातून पठाण या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे.

दैनिक गोमन्तक

Shah Rukh Khan Viral Video: बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शाहरुख सध्या या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे.

काही दिवसांपूर्वी पठाण चित्रपटाचा ट्रेलर बुर्ज खलिफावर (Burj Khalifa) झळकला होता. सध्या शाहरुख हा सोशल मीडियाच्या माध्यमातून पठाण चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. नुकतच शाहरुखने त्याच्या चाहत्यांनी सरप्राइज दिले आहे.

केवळ वाढदिवस किंवा खास दिवशी मन्नत या  बंगल्याच्या बाहेर येऊन चाहत्यांना आपली झलक दाखवणाऱ्या शाहरुखने आता पठाण रिलीज होण्याच्या दोन दिवस आधी मन्नतच्या बाहेर येऊन आपल्या चाहत्यांना सरप्राइज दिले आहे. यावेळी शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी मन्नत बाहेर चाहत्यांनी गर्दी केली होती. 

  • शाहरुखने शेअर केला व्हिडीओ

शाहरुखने इस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुखच्या मन्नत बाहेर चाहत्यांची गर्दी दिसत आहे. या गर्दीमध्ये एक लाल गाडी थांबलेली दिसत आहे. या व्हिडीओला शाहरुखने कॅप्शन दिलं, 'या प्रेमाबद्दल मी तुमचे आभार मानतो.

सॉरी पण आशा करतो की, लाल गाडीवाल्यांनी सीट बेल्ट लावला असेल. आता आपण थिएटरमध्ये भेटूया, पठाणचं तिकीट बुक करा. ' शाहरुखने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पठाण या चित्रपटामध्ये शाहरुख सोबतच अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) हे कलाकार देखील मुख्य भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

'पठाण' हा चित्रपट बॉयकॉट करण्याची मागणी अनेक लोक करत होते. तसेच या चित्रपटातील 'बेशरम रंग' (Besharm Rang) या गाण्यात (Song) दीपिका पादुकोणने परिधान केलेल्या बिकीनीच्या रंगाचा देखील अनेकांनी निषेध केला. पण आता या चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग पाहता हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी कोट्यवधींची कमाई करेल, असा अंदाज लावला जात आहे.

पठाण चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे. हिंदी, तामिळ, तेलुगू भाषेत हा चित्रपट रिलीज होणार आहे. शाहरुखचे चाहते (Fans) या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT