Shah Rukh Khan Juhi Chawla  Dainik Gomantak
मनोरंजन

शाहरुख खान-जुही चावलाची जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दिसणार

जुही चावला आणि शाहरुख खानचे चाहते त्यांच्या आवडत्या जोडीला ऑनस्क्रीन पाहण्यासाठी आतुर आहेत.

दैनिक गोमन्तक

शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि जुही चावला (Juhi Chawla) यांची ऑनस्क्रीन जोडी बॉलिवूडच्या आवडत्या जोडींपैकी एक मानली जाते. 90 च्या दशकात या दोन स्टार्सच्या रोमँटिक केमिस्ट्रीने थैमान घातले होते. जुही-शाहरुखने एकत्र बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत.‘राजू बन गया जेंटलमैंन’ (Raju Ban Gaya Gentleman), ‘डर’ (Darr), ‘यस बॉस’ (Yes Boss), ‘डुप्लीकेट’ (Duplicate), ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’ (Phir Bhi Dil Hai Hindustani) यांसारख्या चित्रपटांमध्ये या दोन कलाकारांच्या जोडीने यशाचा इतिहास रचला होता. आता बातमी आहे की बऱ्याच दिवसांनी ही जोडी पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर दिसणार आहे.

जुही चावलाने शाहरुख खानला संदेश दिला

जुही चावला आणि शाहरुख खानचे चाहते त्यांच्या आवडत्या जोडीला ऑनस्क्रीन पाहण्यासाठी आतुर आहेत. चाहत्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. नुकतेच एका न्यूज पोर्टलने जूही चावलाला विचारले की, जर संधी दिली तर तुला आणि शाहरुख खानला चित्रपटात एकत्र पाहता येईल का? यावर जुहीने उत्तर दिले की, 'आशा आहे की हे लवकरच होईल. आणि हाच प्रश्न शाहरुख खानला विचारा,' असा सल्लाही जुहीने या मुलाखती दरम्यान दिला.

'झिरो'मध्ये दिसले शाहरुख-जुही

2018 मध्ये 'झिरो' चित्रपटात शाहरुख खान दिसला होता, या चित्रपटात जूही चावलाने कॅमिओ म्हणून खास एंट्री घेतली होती. शाहरुखच्या आगामी 'पठाण' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचबरोबर जुही चावलाचा 'शर्मा जी नमकीन' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या कौटुंबिक मनोरंजनात्मक चित्रपटात दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्यासोबत जुही दिसणार आहे. ऋषीच्या या शेवटच्या चित्रपटात जुहीशिवाय परेश रावल, सतीश कौशिक, ईशा तलवार, शीबा चड्ढा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

ऋषी कपूर-जुही चावला यांचा शेवटचा चित्रपट

'शर्मा जी नमकीन' 31 मार्चला Amazon Prime वर रिलीज होणार आहे. जुही आणि ऋषी कपूर यांची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना खूप आवडली होती. आता प्रेक्षकांना पुन्हा एकदा आणि शेवटची ही जोडी पडद्यावर पाहता येणार आहे. कर्करोगाने त्रस्त असलेल्या ऋषींना त्यांच्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करता आले नाही. मात्र त्यांचा हा चित्रपट बघून चाहत्यांना पुन्हा एकदा ऋषी कपूर यांना बघता येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 28 July 2025: खर्च नियंत्रीत ठेवा, आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी ठेवा; कुटुंबात आनंदाचे क्षण येतील

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

Viral Video: '...अन् हात-पाय हलवत राहिला', नाचता-नाचता रोबोटचा ‘तो’ थरारक क्षण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

SCROLL FOR NEXT