Shabana Azmi Dainik Gomantak
मनोरंजन

Shabana Azmi: '...त्यामुळे मला डायलॉग बोलता येत नव्हते' शबाना आझमींनी सांगितला पहिल्या स्क्रीन टेस्टचा अनुभव

दैनिक गोमन्तक

Shabana Azmi: आलिया भट आणि रणवीर सिंग यांची मुख्य भुमिका असलेला रॉकी और रजनी की प्रेम कहानी हा चित्रपट नुकताच रिलिज झाला आहे. करण जोहरने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून अनेक दिग्गज कलाकार आपल्या अभिनयाची झलक दाखवताना दिसत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक कलाकार चर्चेत आले आहेत.

बॉलीवूड इंडस्ट्रीमधील एक दिग्गज अभिनेत्री म्हणून शबाना आझमींकडे पाहिले जाते. 'अमर अकबर अँथोनी', 'अर्थ', 'पार' आणि 'गॉडमदर' या सुप्रसिद्ध चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीला मोठे योगदान दिले आहे.

आता एका मुलाखतीदरम्यान अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवल्यानंतरचे आपले अनुभव सांगितले आहेत. याबरोबरच पहिल्या स्क्रीनटेस्टमधला एक किस्सादेखील शेअर केला आहे.

शबाना आझमी म्हणतात, पहिल्यांदा जेव्हा मी कॅमेरासमोर आले होते, माझ्या पहिल्या स्क्रीनटेस्टनंतर 100 टक्के मला माहीत होते की, हे लोक मला बाहेर काढणार आहेत, मी यांच्या कोणत्याही कामी येणार नाही. पुढे बोलताना त्या म्हणतात- 'मेकअप आर्टिस्टनी माझ्या चेहऱ्यावर इतका मेकअप लावला होता की मला माझे डायलॉग बोलता येत नव्हते.'

शबाना आझमींनी 1974 ला श्याम बेनेगल यांच्या अंकुर या चित्रपटातून डेब्यू केले होते. लक्ष्मीच्या भूमिकेतून त्यांनी प्रेक्षकांचे मन जिंकले होते. आपल्या अभिनयाची झलक त्यांनी त्यांच्या पहिल्याच चित्रपटात दाखवली होती. परंतु मेनस्ट्रीम कॅमेराला जेव्हा त्यांनी फेस केले तेव्हा त्यांनी अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याची कबुलीही शबाना आझमींनी दिली आहे.

'तुम्हाला विश्वास नाही बसणार मात्र माझ्या आयुष्यात, माझ्या करिअरच्या काळात असाही एक काळ होता जेव्हा मला सुलक्षणा पंडीत यांच्यासारखे दिसायचे होते. मला असे वाटायचे की त्यांच्यासारखेच माझ्या चेहऱ्यावर कोणताही मेकअप नसावा आणि विग नसावे. मात्र जितके मी स्वत:ला त्या साच्यात बसवायचा प्रयत्न केला तितकी मी वाईट दिसत गेले' अशी आठवणदेखील त्यांनी सांगितली होते.

दरम्यान, रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटात शबाना आझमी आणि धर्मेंद्र यांच्यातील इंटिमेट सीनची चांगलीच चर्चा रंगली आहे. शबाना आझमी आणि धर्मेंद्र यांच्यासोबतच जया बच्चन, आलिया भट्ट आणि रणवीर सिंग आपल्या अभिनयाची जादू दाखवताना दिसत आहेत.

चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर काहींनी हा चित्रपट डेली सोपचा भाग असल्याचे म्हटले आहे तर काहींनी चित्रपट समाधानकारक असल्याचे म्हटले आहे. आता बॉक्स ऑफीसवर हा चित्रपट किती कमाई करणार याची उत्सुकता दिसून येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, बापाची बाल न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; हायकोर्टाने रद्द केला आदेश

Waqf Amendment Bill 2024: वक्फ बोर्ड कायदा प्रस्तावित दुरुस्तीवरून गोंधळ सुरुच, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

ED Raid: फ्लॅट्सच्या नावाखाली 636 कोटींची फसवणूक; मेरठमधील व्यावसायिकाच्या दिल्ली, गोव्यातील मालमत्तेवर छापे

SCROLL FOR NEXT