Satyaprem Ki Katha Dainik Gomantak
मनोरंजन

Satyaprem Ki Katha: कार्तिक अन् कियाराचा चित्रपट करणार का 50 कोटी पार?

Kiara Advani: कियारा आणि कार्तिक यांना याआधीदेखील एकत्र काम केले आहे.

दैनिक गोमन्तक

Kiara Advani: बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री कियारा अडवाणी आणि प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट 'सत्यप्रेम की कथा' सध्या चर्चेत आहे. लॉकडाऊननंतर बॉलीवूडचे चित्रपट प्रेक्षकांना समाधानी करण्यात अपयशी ठरत होते.

आता मात्र पून्हा चित्रपटांनी जम बसवण्यास सुरुवात केली आहे. सारा अली खान आणि विकी कौशल यांचा जरा हटके जरा बचके या कमी बजेट असणाऱ्या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई केली होती.

आता कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यनच्या चित्रपटानेदेखील हळूहळू का होईना बॉक्स ऑफीसवर 50 कोटींची कमाई केली आहे. समीर विंध्वस यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटाने 6 दिवसांत 50 कोटीच्या जवळपास कमाई केल्याचा एक रिपोर्ट समोर आला आहे.

  • भूल-भुलैया 2 मध्ये केले आहे एकत्र काम

कियारा आणि कार्तिक यांना याआधीदेखील एकत्र काम केले आहे. याआधी त्यांनी 'भूल-भुलैया 2' मध्ये सोबत काम केले आहे. 'भूल-भुलैय्या2' ने बॉक्स ऑफीसवर धुमाकुळ घातला होता. हा चित्रपट यशस्वी चित्रपटांपैकी एक मानला जातो. कार्तिक आणि कियाराची जोडीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

सध्या कार्तिक आणि कियाराच्या सत्यप्रेम की कथा या चित्रपटाला टक्कर देण्यासाठी चित्रपटगृहात इतर कोणताही चित्रपट नाही. मात्र लवकरच '72 हुरें', 'अजमेर 92' हे बहुप्रतिक्षित चित्रपच 14 जुलैला रिलिज होणार आहे. 'केरला स्टोरीज' आणि 'द काश्मिर फाइल्स ' च्या यशानंतर आता हे चित्रपटदेखील हीट होतील असे म्हटले जात आहे.

दरम्यान, कियाराचा पती आणि बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने चित्रपटाच्या स्क्रिनिंगनंतर कियाराचे कौतुक केले होते. चित्रपटातील सगळ्यांनीच उत्तम काम केले आहे. मात्र कथाच्या पात्राने माझ्या ह्रदयात घर केले आहे.

कियारा तू हे पात्र निवडलेस त्यासाठी मी खूप आनंदी आहे. खोलवर परिणाम करणारे आणि अनेकविध भावनांनी भरलेले हे पात्र असल्याचे सिद्धार्थने म्हटले आहे. तुझे आणि तुझ्या संपूर्ण टीमचे कौतुक आहे,असे सिद्धार्थने सोशल मिडियावर म्हटले होते. 60 कोटी बजेट असलेला हा चित्रपट आणखी किती कमाई करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT