Sardar Udham Singh teaser out, Vicky Kaushal's film to be released on Amazon Prime
Sardar Udham Singh teaser out, Vicky Kaushal's film to be released on Amazon Prime  Dainik Gomantak
मनोरंजन

विकी कौशलच्या 'सरदार उधम सिंह' चा टीझर झाला रिलिज

दैनिक गोमन्तक

'मसान', 'उरी द सर्जिकल स्ट्राइक' सारख्या चित्रपटांनी मने जिंकणारे अभिनेता विकी कौशलच्या (Vicky Kaushal) आगामी सरदार उधम सिंग (Sardar Udham Singh) या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. टीझरचा व्हिडिओ अभिनेता विक्की कौशलने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तसेच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.

टीजर व्हिडिओची सुरुवात अभिनेता विक्की कौशलने पासपोर्टवर त्याचा फोटो घेऊन केली. विविध नावांसह अनेक पासपोर्ट व्हिडिओमध्ये दिसत आहेत. पण शेवटी महान स्वातंत्र्य सेनानी सरदार उधम यांच्या नावाने पासपोर्ट येतो. इन्स्टाग्रामवर हा टीझर व्हिडिओ शेअर करताना अभिनेता विक्की कौशलने कॅप्शन लिहिले, 'शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त, त्यांचे सहकारी सरदार उधम सिंह यांची कथा एक माणूस, अनेक आडनाव, एक मिशन सादर करण्याचा मला अभिमान आहे.'

सरदार उधम सिंहच्या टीझरला इन्स्टाग्रामवर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. व्हिडिओला आतापर्यंत साडेतीन लाखांहून अधिक लोकांनी पसंती दिली आहे आणि बॉलिवूड मधील कलाकार कमेंट करून त्याचे अभिनंदन करत आहेत. टीझरच्या शेवटी चित्रपटाची रिलीज डेट देखील येते. सरदार उधम सिंह हा चित्रपट 16 ऑक्टोबर रोजी ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.

13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरमधील जालियनवाला बाग येथे जमलेल्या शेकडो निरपराध लोकांची हत्या करणाऱ्या जनरल डायरची हत्या करून जालियनवाले हत्याकांडाचा बदला घेतला. शुजित सरकार यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची निर्मिती राईजिंग सन फिल्म्सने किनो वर्क्सच्या सहकार्याने केली आहे. विकी कौशल या चित्रपटात सरदार उधम सिंहच्या भूमिकेत दिसणार आहे. हा ॲमेझॉन ओरिजिनल चित्रपट 16 ऑक्टोबर रोजी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी प्रदर्शित होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Richest Candidate Pallavi Dempo: पल्लवी धेंपे तिसऱ्या टप्प्यात देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार

Goa Today's Live News: भाजपला सत्तेतून हटविण्याची वेळ आलीय - मिकी पाशेको

Harmal News : डबल इंजीन सरकारमुळेच विकास : दयानंद सोपटे

Lok Sabha Elections 2024: वोट फॉर काँग्रेस; दिल्लीत यासिन मलिकसोबत मनमोहन सिंग यांचे पोस्टर कोणी लावले?

सोनीनं लॉन्च केलं फ्युचरिस्टिक 'वेअरेबल एअर कंडिशनर' गॅझेट! जाणून काय आहे खासियत

SCROLL FOR NEXT