Sara Ali Khan  Dainik Gomantak
मनोरंजन

Sara Ali Khan ने केली मुंबई लोकची सफर, व्हिडिओ शेअर करत म्हणली....

Sara Ali Khan Video: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने सोशल मीडियावर लोकल ट्रेनमधील व्हिडिओ शेअर केला आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान तिच्या साधेपणासाठी ओळखली जाते. ग्लॅमरस दुनियेशी संबंधित असूनही ती नेहमीच डाउन टू अर्थ व्यक्ती असते. अलीकडे तिने मुंबईत लोकल ट्रेन आणि ऑटोमध्ये प्रवास करतांनाचा व्हिडिओही त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्याला लोक खूप पसंत करत आहेत.

'केदारनाथ' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण करणाऱ्या सारा अली खानने (Sara Ali Khan) अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला सारा अली खान लोकल ट्रेनमध्ये दिसत आहे. यानंतर तिने ऑटो राईड देखील केली. व्हिडिओ शेअर करताना सारा अली खानने कॅप्शनमध्ये लिहिले की, “हॅलो दर्शक. आज आम्ही आमच्या मेंदूचा वापर केला आणि आमच्या वेळेचा चांगला उपयोग केला आणि ट्रेन पकडली."

साराने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तसेच तिने मेकअपदेखील केलेला नाही. त्यामुळे ती आणखी सुंदर दिसत आहे. साराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तिचा साधेपणा चाहत्यांना आवडला आहे. एवढी श्रीमंत असूनही लोकलने प्रवास, अभिमान वाटतो, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 

  • साराचे आगामी सिनेमे

साराने 2018 साली 'केदारनाथ' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. तिचा पहिलाच चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. त्यानंतर तिने 'सिम्बा' 'कुली नंबर 1', 'लव आज कल', 'अतरंगी रे' अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. लवकरच ती 'मेट्रो इन दिनो', 'नखरेवाली', 'लुका छुप्पी', 'गॅसलाइट' आणि 'द इमोर्टल अश्वाथामा' या सिनेमांत झळकणार आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: "मी भाजपमध्ये जाणार, ही केवळ वावडी", अफवा पसरवणाऱ्यांची तोंडं सरदेसाईंनी केली बंद VIDEO

Indian Racing Festival 2026: गोव्यात रंगणार 'इंडियन रेसिंग फेस्टिव्हल'चा थरार, CM प्रमोद सावंतांनी पोस्ट करत दिली माहिती

VIDEO: "म्हणून 50 हजार खर्चून गोव्याला जातो!" समुद्रात कचरा फेकणाऱ्या पर्यटकाचा व्हिडिओ पाहून नेटकर्‍यांचा पारा चढला

Rohit Sharma Record: 'हिटमॅन'च्या निशाण्यावर बूम बूम आफ्रिदीचा 'तो' मोठा रेकॉर्ड; तिसऱ्या सामन्यात रोहित रचणार इतिहास

"एक आठवड्यात 10 कोटी दे नाहीतर तुला..." प्रसिध्द गायकाला 'लॉरेन्स बिश्नोई गँग'कडून धमकी, मनोरंजन विश्वात खळबळ

SCROLL FOR NEXT