Sara Ali Khan  Dainik Gomantak
मनोरंजन

Sara Ali Khan Birthday: ...अन् म्हणून साराने रिमेक चित्रपट न करण्याचा घेतला निर्णय

Sara Ali Khan Birthday: यादरम्यान, तिने दोन रिमेक चित्रपटात काम केले आहे

दैनिक गोमन्तक

Sara Ali Khan Birthday: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खानने आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान निर्माण केले आहे. आज साराचा वाढदिवासाच्या निमित्ताने तिने चित्रपटांबाबत घेतलेल्या एका महत्वाच्या निर्णयाबद्दल जाणून घेणार आहोत.

केदारनाथ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेल्या सारा अली खानने एकापाठोपाठ अनेक चित्रपटात काम केले आहे. मात्र तिच्या अनेक प्रोजेक्टपैकी अतरंगी रे या तिची ओळख निर्माण केली आहे. यादरम्यान, तिने दोन रिमेक चित्रपटात काम केले आहे. हे दोन चित्रपट म्हणजे कुली नंबर 1 आणि लव्ह आज कल या रिमेक चित्रपटातून काम केले आहे. मात्र प्रेक्षकांनी या चित्रपटांना म्हणावा तसा प्रतिसाद दिला नसल्याचे दिसून आले आहे.

एका मुलाखतीदरम्यान, तिने अशा चित्रपटांबद्दल बोलताना म्हटले आहे की, मी आत्तापर्यंत दोन प्रसिद्ध चित्रपटांच्या रिमेकमध्ये काम केले आहे आणि त्यावरुन मला एवढे समजले आहे की, काही चित्रपटांना स्पर्श करायचा नसतो. त्यामुळे मी भविष्यकाळात कोणत्याही रिमेक चित्रपटात काम करणार नाही असे साराने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, अलीकडेच ती वरुण धवनसोबत बवाल चित्रपटात दिसून आली होती. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने ती चर्चांचा भाग बनली होती. आता ती भविष्यात कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

‘मी पत्रकार असतो तर ...’ सरदेसाईंच्या मिश्किल प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा; Watch Video

Mohammed Siraj: 'मी बोल्ड करतो, तेंव्हाच सेलिब्रेशन करतो'! टीका करणाऱ्या इंग्लंडच्या चाहत्यांवर सिराजचा बाऊन्सर

Rainforest Challenge 2025: खडकाळ वाटा, पाणथळ रस्ता आणि 'रेनफॉरेस्ट चॅलेंज'चा थरार..

America Arms Supply: अमेरिकेने दिली पाकला शस्त्रे! भारताची आक्रमक भूमिका; 1971 ची बातमी केली Twit

Goa Assembly Live: रंगमंच कलाकार, उद्योजक परेश जोशी यांचे निधन

SCROLL FOR NEXT